ग्राहक केंद्रबिंदु मानून बॅंकेची वाटचाल : डॉ. अनिल देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक केंद्रबिंदु मानून बॅंकेची वाटचाल : डॉ. अनिल देशपांडे
ग्राहक केंद्रबिंदु मानून बॅंकेची वाटचाल : डॉ. अनिल देशपांडे

ग्राहक केंद्रबिंदु मानून बॅंकेची वाटचाल : डॉ. अनिल देशपांडे

sakal_logo
By

34573
कडगाव (ता. आजरा) : येथे आयोजित ग्राहक मेळाव्यात बोलताना डॉ. अनिल देशपांडे. या वेळी शैला टोपले, अस्मिता सबनीस, प्रणिता केसरकर आदी.

ग्राहक केंद्रबिंदु मानून
बॅंकेची वाटचाल
---
डॉ. अनिल देशपांडे; आजरा बॅंकेतर्फे ग्राहक मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० : शहरी व ग्रामीण भागात बॅंक कार्यरत आहे. ग्रामीण भागातील ग्राहक हा केंद्रबिंदू मानून बॅंकेची वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेप्रमाणे ग्राहकांना सेवा सुविधा दिल्या जात आहेत. याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन दि आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी केले.
कडगाव (ता. भुदरगड) येथे दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावा झाला. या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते. कडगावचे सरपंच संजय चव्हाण अध्यक्षस्थानी होते. शाखाधिकारी जोतिबा निकम यांनी स्वागत केले. संचालक शैलेंद्र उळेगड्डी यांनी प्रास्ताविकात कडगाव शाखेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाखा स्थापनेपासून १०० टक्के कर्जवसुली व मुख्य कार्यालयाकडून दिले जाणारे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेले कर्मचारी व सभासादांचे आभार मानण्यात आले. डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘बँकेचा एकूण व्यवसाय हा एक हजार २०० कोटी रुपयांचा आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ असून, नेट एनपीए शून्य टक्के आहे. अण्णा भाऊ संस्थासमूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णा भाऊ समूहाच्या सर्व संस्था प्रगतीच्या मार्गावर आहेत.’’ माजी सरपंच शिवाजीराव देसाई, सदस्य अजित मांगले, संचालिका शैला टोपले, प्रणिता केसरकर, अस्मिता सबनीस, कर्ज विभागप्रमुख बंडू प्रभू, डॉ. काजी, ए. जी. कासार, सचिन जाधव, श्रीकांत हावळ, अमृत शिंदे, बचाराम गुरव, हर्षल उळेगड्डी, रामचंद्र मांगेल, सुभाष गुजर, भानुदास हावळ, पांडुरंग गोजरे, समीर देसाई, नागरिक व ग्राहक उपस्थित होते. अभिजित केसरकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75353 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..