मॅक्सी कॅबला परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅक्सी कॅबला परवानगी
मॅक्सी कॅबला परवानगी

मॅक्सी कॅबला परवानगी

sakal_logo
By

लीड
राज्यात एसटी महामंडळ रोज ७३ लाख प्रवाशांची वाहतूक करीत होते. मात्र, विविध कारणाने एसटी तोट्यात गेली. परिणामी, खासगी वाहतूक प्रवाशांना आधार ठरली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणारी, अपघाताची शक्यता वाढवणारी ही वाहतूक बेकायदेशीर होती. त्याच व्यवसायाला अधिकृत परवानगी देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. मान्यता एक आणि अडचणी अनेक अशी अवस्था झाली आहे. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून...
................

लोगो-
खासगी वाहतूक
कायदेशीर वळणावर- भाग १

खासगी वाहतुकीला मान्यतेच्या हालचाली
---
शासनाकडून समिती स्‍थापन; अहवाल मागविले, अभ्यास सुरू
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः शहरातील एखाद्या वर्दळीच्या चौकात थांबलेली काळी-पिवळी चारचाकी (मॅक्सी कॅब) दहा-बारा प्रवासी बसले, की भरधाव वेगाने गावच्या दिशेने सुसाट धावते. एकावेळी दहा-बारा जणांचा प्रवास घडतो. शहर व ग्रामीण भागाचा रोजच्या जगण्याच्या धडपडीचा प्रवास घडवणारी खासगी वाहने बहुतेक मार्गावर धावतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक म्हणून या खासगी वाहतुकीला वडाप नावाने हिणवले गेले.
शासकीय यंत्रणेतील काहींनी तर दंडाची भीती घालत खासगी वाहतूकदारांकडून ‘एंट्री’चा लाभ उकळला. यात अनेक व्यावसायिक कंगाल झाले. आता खासगी प्रवासी वाहतुकीतीला मान्यता देण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी परिवहन विभागाचे प्रवासी वाहतूक नियम, अंमलबजावणी, जिल्ह्यातील खासगी वाहनांची संख्या, प्रवासी वाहतुकीची माहितीही मागवली आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय जरूर होईल. तेव्हा जिल्ह्यातील दीड हजारांवर खासगी वाहतुकीच्या गाड्यांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. नियमाला फाटा देत धोकादायक अशी प्रवासी वाहतूक झाल्यास ती प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. तसे झाल्यास या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यंत्रणा आणखी अपुरी पडेल. त्यासाठी पोलिस व परिवहन विभागाकडील मनुष्यबळ वाढवावे लागेल. अशा पर्यायांची सोय करूनच परवानगी देण्याचा विचार होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या समितीची नुकतीच बैठक झाल्यावर खासगी प्रवासी वाहतुकीला विरोधही सुरू झाला.

शासनाच्या हालचाली अशा ः
* निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
* ही समिती राज्य शासनाला अहवाल देणार
* राज्यातील एसटी वाहतुकीची स्थिती तपासणार
* काही दिवसांत हरकती व सूचना मागविणार
* त्यांचा अभ्यास करून अंतिम अहवाल करणार
* अहवालावरून टप्पे वाहतुकीसाठी खासगीला परवानगीची शक्यता
* अधिकृत प्रवासी वाहतूकदारांचा दर्जा मिळण्याची चिन्हे आहेत

(आकडेवारी मोठी करा)
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील खासगी वाहतूक
* खासगी वाहतूक गाड्या- ५०००
* सुरू असलेल्या खासगी गाड्या- १५००
* व्यवसायावर अवलंबून लोक- १० ते १२०००
* व्यवसायात रोजची उलाढाल- १५ ते २० लाख

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75361 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..