सर्व सामान्यांचा लोकनेता तानाजी बाळू पोवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व सामान्यांचा लोकनेता तानाजी बाळू पोवार
सर्व सामान्यांचा लोकनेता तानाजी बाळू पोवार

सर्व सामान्यांचा लोकनेता तानाजी बाळू पोवार

sakal_logo
By

माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार वाढदिवस विशेष
34592
तानाजी पोवार
34593
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतांना इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार.

सर्व सामान्यांचा लोकनेता
तानाजी बाळू पोवार
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवनात सुस्थिर होणारे अनेकजण असतात. मात्र त्यातील कितीजण यशस्वी झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकी जोपासतात, हा संशोधनाचा विषय ठरतो. परंतु या दोन्ही घटकांमध्ये संतुलन व समन्वय राखत सामाजिक क्षेत्रात यशस्वी ठरलेले व सर्वसामान्यांचा प्रतिनिधी अशी ओळख निर्माण झालेले सामाजिक कार्यकर्ता ते उपनगराध्यक्ष अशी भरारी घेणारे तानाजी बाळू पोवार यांचा जीवनप्रवास अनेकांना आदर्शवत ठरावा असाच आहे. त्यांचा आज (शनिवार) वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
----------------
एका सर्वसामान्य दगड फोडणाऱ्या वडार समाजातील कुटुंबात ९ जुलै १९७२ रोजी तानाजी पोवार यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. लहानपणापासून कामाची आवड असल्याने त्यांचा ओढा सामाजिक कार्याकडे वाढत होता. त्यातूनच ते विविध राजकीय मंडळींच्या संपर्कात येत गेले आणि सन १९९६ मध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. १९९६ ते २००१ या कालावधीत ते इचलकरंजी नगरपरिषदेच्या तरू कमिटीमध्ये सदस्य होते. त्यानंतर २००१ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पहिल्याच प्रयत्नात जनतेने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवून दिले. जनतेने दाखविलेल्या विश्‍वासाला पात्र राहून त्यांनी प्रभागात विकासकामांचा धडाका लावला. याच दरम्यान त्यांना पाणीपुरवठा समिती सभापतिपदाची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा त्यांनी जनतेच्या विकासासाठी पुरेपूर वापर केला. सन २००६ मध्ये ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि सलग दुसऱ्यां‍दा नगरपरिषदेत गेले. या वेळी त्यांना सलग दोन वर्षे पाणीपुरवठा समिती सभापती पदाची संधी मिळाली. त्याद्वारे त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध विकासकामांसाठी निधी खेचून आणला. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी स्वीकृत सदस्य होते. तर सन २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने ते जनतेच्या पाठबळावर भाजपचे नगरसेवक म्हणून विराजमान झाले. त्यांच्या कामाची माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी दखल घेऊन त्यांच्यावर पक्षप्रतोद पदाचीही धुरा सोपविली. २०१९ पासून ते इचलकरंजी नगरीचे सलग तीन वर्षे उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत होते.
आपल्यावर सोपविलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिक व निष्ठेने पार पाडली. त्यांचा हा राजकीय प्रवास सुरू असताना त्यांनी समाजकार्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तर वडार समाजाच्या ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे ते प्रदेश सरचिटणीस आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी तीनवेळा पाणी पुरवठा व जलनिस्साःरण समिती सभापती म्हणून काम पाहताना कृष्णा पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात मोलाचा वाटा घेत शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळवून दिले. शहरातील झोपडपट्टीधारकांना नगरपरिषदेतर्फे विनाअट ना हरकत दाखला मिळवून देऊन त्यांना वीज कनेक्शन घेण्यात येणारी अडचण दूर केली. शहरातील सन १९९५ पूर्वीच्या झोपडपट्ट्यांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन समाजकल्याण मंत्री जयवंतरावजी आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले. अनेक युवक-युवतींना केंद्र शासनाच्या मुद्रा योजना अंतर्गत व्यावसायिक कर्जपुरवठ्यासाठी मार्गदर्शन करण्यासह पाठपुरावा करून लाभ मिळवून दिला.
आजही ते सर्वसामान्यांचे प्रतिनिधी बनून कार्यरत असून सकाळपासूनच त्यांच्याकडे अनेकजण विविध कामांच्या निमित्ताने येत असतात. त्यांच्यासमोर जमलेली गर्दी पाहून जनता दरबार असे संबोधले जाते. अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांचा हा जनता दरबार सलगपणे भरलेला असतो. कोरोना संसर्गाच्या कालावधीत सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य, कष्टकरी नागरिकांना विविध प्रकारची मदत मिळवून देण्यातही पोवार यांचे महत्त्‍वपूर्ण योगदान आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात हातावर पोट असलेल्या गोरगरीब भाजीपाला व फळ विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सार्वजनिक सुटी दिवशी काम करणाऱ्या नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना सुटी दिवशीचा केलेल्या कामाचा पगार मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. इचलकरंजी महानगरपालिका मंजूर होणेसाठी कौन्सिलमध्ये भाजप पक्षप्रतोद म्हणून एकमताने ठराव मंजूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे एक उत्तम आदर्शवत उदाहरण म्हणजे तानाजी बाळू पोवार असे म्हटले ते वावगे ठरू नये. राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात, पण सर्वसामान्यांच्या अडीअडचणी, प्रश्‍न सोडविण्यासाठी झटणारे मोजकेच असतात, त्यामध्ये तानाजी पोवार यांचा नामोल्लेख करावा लागेल.
- विनय गवळी, इचलकरंजी
----------
पुरवणी संकलन : पंडित कोंडेकर, इचलकरंजी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75376 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top