महादेव संस्थेचे पाटील अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महादेव संस्थेचे पाटील अध्यक्ष
महादेव संस्थेचे पाटील अध्यक्ष

महादेव संस्थेचे पाटील अध्यक्ष

sakal_logo
By

34616
दौलती पाटील, संदिप पाटील

महादेव संस्थेचे पाटील अध्यक्ष
आजरा : कोरीवडे (ता. आजरा) येथील महादेव विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दौलती अंतू पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी संदिप गणपती पाटील यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक एस. व्ही. पाटील निवड सभेच्या अध्यक्षपदी होते. अध्यक्षपदासाठी दौलती पाटील यांचे नाव यांनी कृष्णा तुकाराम रायकर यांनी सुचविले. सुनिल लक्ष्मण पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संदिप पाटील यांचे नाव सयाजी आनंदा पाटील यांनी सुचविले. धोंडीबा कृष्णा पाटील यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष दौलती पाटील यांचा सयाजी आनंदा पाटील यांनी, तर उपाध्यक्ष संदिप पाटील यांचा नामदेव जानू पेडणेकर यांनी सत्कार केला. अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘संस्थेची निवडणूक अटीतटीने झाली. पण गेली पंचवीस वर्ष संस्थेचा कारभार पारदर्शक व काटेकोरपणे केल्याने सभासदांनी आमच्याकडे सत्ता सोपवली. पुढेही संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार आहे.’’ या वेळी संचालक शिवाजी राजाराम गुरव, आनंदा परसु चौगुले, युवराज शामराव कळेकर, मंजूळा आनंदा मस्कर, सूरज गणपती कांबळे, लक्ष्मी महादेव मिसाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75423 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..