
प्लास्टिक बंदी
34626
प्लास्टिक वापरणाऱ्या सहा
व्यापाऱ्यांना ३० हजार दंड
कोल्हापूर : महापालिकेने शुक्रवारी सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजाराचा दंड वसूल केला. नागरिक व व्यावसायिकांवर महापालिकेच्या भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. शाहूपुरी परिसरातील मनीष ट्रेडर्स, सदगुरू ट्रेडर्स, सुनील शिंदे, सोहम हॉटेल, विराट फ्रूट मर्चंट व राजेश ट्रेडर्स अशा सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजाराप्रमाणे ३० हजाराचा दंड वसूल केला. उपायुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक मुनीर फरास, मनोज लोट, शिवाजी शिंदे, स्वप्नील उलपे, महेश भोसले, नंदकुमार पाटील व करण लाटवडे यांनी कारवाई केली.
१८१२
पट्टणकोडोलीतील वृद्ध अपघातात ठार
हुपरी : पट्टणकोडोली इंगळी मार्गावर भरधाव डंपरने मागून धडक दिल्याने सायकलस्वार वृद्ध जागीच ठार झाला. बाजीराव गणपती चोपडे (वय ६५ पट्टणकोडोली) असे मृताचे नांव आहे. याप्रकरणी डंपरचालक शशिकांत रावसो पाटील (इंगळी) याच्यावर हुपरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले, चालक शशिकांत पाटील हा डंपर (एम एच ०९ ई एम ०९२०) घेऊन इंगळीहून पट्टणकोडोलीकडे निघाला होता. त्यावेळी ताबा सुटल्याने बाजीराव चोपडे या सायकलस्वारास मागून धडक दिली. यात चोपडे यांचा मृत्यू झाला. चोपडे हे पिराई मळ्यातून घरी निघाले होते. गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब हजारे अधिक तपास करीत आहेत.
विवाहिता छळाचा पाच जणांवर गुन्हा
गांधीनगर ः माहेरहून घरभाड्यासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासरा, सासू, नणंद, नणंदेच्या पतीने छळ केल्याची फिर्याद समिना असिफ आत्तार (वय २६, पुणे, सध्या, उचगाव) यांनी दिली. गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. समिना यांचा विवाह असिफ आत्तार यांच्याशी झाला होता. काही दिवसांनी सासरच्या लोकांनी लग्नात मानपान केला नाही असे टोमणे मारून घरभाड्यासाठी पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. १५ डिसेंबर २०२१ ते १ मार्च २०२२ या कालावधीमध्ये समिनाचा पती असिफ, आदिलशहा महमंद आत्तार, शमीम आदिलशहा आत्तार, आसमा ईर्शाद शिखलगा, ईर्शाद अहमंद शिखलगार (पुणे) यांनी छळ केल्याची फिर्याद समिना आत्तार यांनी दिली. तपास सहायक फौजदार गायकवाड करत आहेत.
कोडोलीतील संशयितास पोलिस कोठडी
कोडोली : मंत्रालयामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केलेल्या सचिन पाटील (कोडोली) यास नेरुळ मुंबई येथून अटक केली. आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याबाबतची फिर्याद निखील पंडीत कणसे (कोडोली) याने कोडोली पोलिसात दिली होती. सचिन पाटील याने निखील कणसे यांच्याशी ओळखीचा फायदा घेत मंत्रालयामध्ये नोकरी लावतो असे सांगत दोन लाख घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन करणेसाठी त्यांना नियुक्ती पत्र दिले. बरेच दिवस होऊनही नोकरी मिळाली नसल्याने पाठपुरावा केला तरीही नोकरी मिळाली नसल्याने कणसे यांनी कोडोली पोलिसात तक्रार दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75428 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..