सुधारित : फये तलावाचा भरावा खचला : दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये खर्च. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित : फये तलावाचा भरावा खचला : दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये खर्च.
सुधारित : फये तलावाचा भरावा खचला : दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये खर्च.

सुधारित : फये तलावाचा भरावा खचला : दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये खर्च.

sakal_logo
By

३७०८


फटे प्रकल्पाच्या भिंतीचा भराव खचला
कोट्यवधीचा खर्च; गेटजवळील गळती तातडीने न रोखल्यास धोका
सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ७ : कांही दिवसांपूर्वीच कोट्यावधी खर्च करून दुरुस्ती केलेल्या फये लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळील भिंतीचा भरावा खचल्याने धरणाला गळती लागली आहे. मुख्य भिंतीतील गेट जवळील दोन्ही बाजूने गळती सुरू झाल्याने तलावाला धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील फये व मिणचे खोऱ्यातील वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची व पिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी १९९८ मध्ये दिवंगत आमदार नामदेवराव भोईटे यांच्या विशेष प्रयत्नाने प्रकल्पाची उभारणी केली. प्रकल्पाची साठवणूक क्षमता १३८.८८ दशलक्ष घनमीटर असून ७०० हेक्टराला पाणी मिळत होते. सुरुवातीपासून मुख्य गेटला गळती लागल्याने तलावात म्हणावा तसा साठा होत नव्हता. मार्चमध्ये तलाव कोरडा पडत होता. गळतीमुळे तलावालाही धोका निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तलावाची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला.
तलावाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सावंतवाडी येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला हे काम दिले. तलाव पूर्ण कोरडा करून मार्च महिन्यात दुरुस्ती सुरू केली. अत्यंत घाई गडबडीत कामाचा दर्जा न राखता हे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले. पहिल्याच पावसात मुख्य भिंतीचा गेटजवळील भरावा व पिचींग खचू लागले आहे. दुरुस्ती केलेल्याच गेटजवळील दोन्ही बाजी खचल्या आहेत. तेथून पाणी वाहून जात आहे. प्रकल्पात मोठा साठा केल्यास तलावाला धोका पोहचू शकतो.

दुरुस्तीसाठी कोट्यावधी खर्च करूनदेखील भरावा खचल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेले अधिकारी नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.


कोट
पावसामुळे नवीन भराव खचत असतो. पहिल्या पावसात तो थोड्या प्रमाणात खचतोच. त्यामुळे तो खचला आहे. यामुळे प्रकल्पास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
- मनोज देसाई, शाखा अभियंता, पाटबंधारे भुदरगड

प्रकल्पाचा नवीन भराव असल्याने तो कांही प्रमाणात पहिल्या पावसात बसतो. पाऊस कमी झाल्यास ते काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे तलावास कोणताही धोका नाही. आम्ही त्यासाठी जबाबदार आहोत.
- के. सी. शिवाण्णा, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन सावंतवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75436 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top