‘जागृती’मध्ये छात्रशिक्षकांना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जागृती’मध्ये छात्रशिक्षकांना शुभेच्छा
‘जागृती’मध्ये छात्रशिक्षकांना शुभेच्छा

‘जागृती’मध्ये छात्रशिक्षकांना शुभेच्छा

sakal_logo
By

‘जागृती’मध्ये छात्रशिक्षकांना शुभेच्छा
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्दितीय वर्षाच्या छात्रशिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या. माजी गुणवंत छात्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी होत्या. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्रा. शिवाजी भुकेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गुणवंत छात्रशिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. भुकेले यांनी भारतीय शिक्षक आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती घाळी, डॉ. घाळी यांचीही भाषणे झाली. प्राचार्या सुनीता पाटील, उमेश सावंत, प्रा. एस. बी. मगदूम, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. एस. एस. जाधव, ग्रंथपाल पी. डी. कोरे, अनिल दड्डी, कृष्णकांत बामणे आदी उपस्थित होते. आरती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. एम. नवले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75443 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top