निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

३४६९९
सर्जेराव जरग
कोल्हापूर : बाबा जरगनगर येथील सर्जेराव पिराजीराव जरग (वय ५४) यांचे निधन झाले. जरगनगरातील मराठा मावळा तरूण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अध्यात्मिक केंद्राचे विश्वस्त व श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होत. ते जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेत व्यवस्थापक होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. ९) आहे.

३०७४
बाबूराव साळोखे
पुनाळ : मानेवाडी (ता. पन्हाळा) येथील बाबूराव पांडुरंग साळोखे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे ‌.

०२९६३
बायाका नलवडे
म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथील श्रीमती बायाका आनंदा नलवडे (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सेवानिवृत मुख्याध्यापक शंकरराव नलवडे यांच्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.

३४६६९
सहदेव कुरणे
कोल्हापूर : नवीन चिखली (ता. करवीर) येथील सहदेव गणू कुरणे (वय ९४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ९) आहे.

३४६६६
रामचंद्र कांबळे
गडहिंग्लज : शहरातील शिवाजी रोड येथील खाटिक समाजाचे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र विठोबा कांबळे-बसर्गे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्या (शनिवारी) सकाळी रक्षाविसर्जन आहे.

३४६६७
विष्णू चव्हाण
इचलकरंजी : येथील डेक्कन परिसरातील विष्णू हरि चव्हाण (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मूळचे चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.


३७१२
नामदेव केसरकर
कोनवडे ः फये (ता. भुदरगड) येथील नामदेव कृष्णा केसरकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.


०१८१०
आक्काताई माणकापूरे
हुपरी ः येथील आक्काताई काशीनाथ माणकापूरे (वय ८९) यांचे निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते भरत माणकापूरे यांच्या त्या आई व प्रा. किशोर माणकापूरे यांच्या आजी होत. जलदान विधी रविवारी ( ता. १०) आहे.

अभयकुमार किणींगे
रांगोळी ः येथील ज्येष्ठ व्यापारी व नाट्य कलावंत अभयकुमार आदिशा किणींगे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
.....
00977
हिराबाई जाधव
सांगवडे (ता. करवीर )येथील श्रीमती हिराबाई महादेव जाधव (वय 90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे करवीर तालुका उपाध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार ता. 9 ला सकाळी साडेनऊ वाजता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75471 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..