पंचगंगा फुटाने उतरली; कोल्हापूरकरांचा धोका तूर्तास टळला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water in Panchgang river basin was reduced by one foot
पाऊस ८ जुलै २०२२

पंचगंगा फुटाने उतरली; कोल्हापूरकरांचा धोका तूर्तास टळला!

कोल्हापूर - पंचगंग नदी पात्रातील पाणी एक फुटाने कमी झाले असून, पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात गेली चार दिवस रेड अलर्ट होता. उद्या (ता. ९) पासून पुढे ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुन्हा पंचगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता कमी आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्यामुळे राधानगरी धरण ४४ टक्के भरले आहे. आठवड्यापूर्वी ते २८ टक्के होते. जिल्ह्यात आजही एकूण २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

पेरण्यांची लगबग आता वाढली असून, गेली तीन दिवस झालेल्या पावसाने भात रोपणीला गती मिळणार आहे. पावसाचे प्रमाण वाढले नसल्यामुळे शेतकरी सुखावला असून, शेतीच्या कामांना आता वेग येत आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरीही पंचगंगा नदीची पाणी पातळी कालपेक्षा आज सायंकाळी सात वाजता सुमारे १ फुटाने कमी होऊन ती ३० फूट एक इंचावर राहिली. आज सकाळी ती ३१ फूट आठ इंचांपर्यंत होती. जिल्ह्यात सर्वधिक पावसाचे प्रमाण गगनबावडा तालुक्यात ८६.८ मिलिमीटर नोंद झाले आहे. उर्वरित तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

जिल्ह्यात सकाळी सातपर्यंतच्या २४ तासांत पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये - हातकणंगले- ३.८, शिरोळ -३.४, पन्हाळा- १८.८, शाहूवाडी-२६.६, राधानगरी- २८.४, गगनबावडा-८६.८, करवीर- ११, कागल- १२.५, गडहिंग्लज- ९.७, भुदरगड- ४१.५, आजरा-२५ , चंदगड- ३३.२ पाऊस पडल्याची नोंद आहे.

राधानगरी धरणातून १२०० क्युसेक विसर्ग सुरू असून १०० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी ४४, तुळशी ४६.१५, वारणा ४३, दूधगंगा (काळम्मावाडी) ३६, कुंभी ५०.८७, तर कासारी ५४.१ टक्के भरले आहे.

२७ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वाळोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये - तुळशी ४४.९८, वारणा ४१४.१८, दूधगंगा २५५.२१, कासारी ४०.१८, कडवी २९.८६, कुंभी ३८.९५, पाटगाव ४८.०९, चिकोत्रा २०.५०, चित्री २०.३८, जंगमहट्टी १८.२७, घटप्रभा ४४.१७ , आंबेआहोळ २०.८५, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

सकाळी सात वाजता बंधाऱ्यांची पाणीपातळी फुटामध्ये अशी - राजाराम ३१.८, सुर्वे ३०.२, रुई ६०.६ फूट, इचलकरंजी ५६.६ फूट, तेरवाड ४९.९ फूट, शिरोळ ३९ फूट, नृसिंहवाडी ३५.३ फूट, राजापूर २५.४ फूट, तर सांगली ८.३ फूट व अंकली १२.७ फूट.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75497 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..