११ ते १७ ऑगस्ट हर घर पे तिरंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

११ ते १७ ऑगस्ट हर घर पे तिरंग
११ ते १७ ऑगस्ट हर घर पे तिरंग

११ ते १७ ऑगस्ट हर घर पे तिरंग

sakal_logo
By

‘हर घर तिरंगा’त सहभागी करून घ्या
जिल्हाधिकारी रेखावार; ११ ते १७ ऑगस्टदरम्यान उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवायचा आहे. उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सर्व संस्था, कार्यालयांच्या इमारतींवर, तसेच प्रत्येक नागरिक आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करा. उपक्रमांत सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्या. राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होईल, याची खात्री करा. विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याबरोबरच या केंद्रांना ध्वजाचा आकार व अन्य अनुषंगिक बाबींच्या सूचना द्या. भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करा. नागरिकांना तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यासाठी प्रेरित करा.’’
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नियोजन केले आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय इमारती, फ्लॅट व घरांची माहिती घेऊन त्यानुसार हा उपक्रम चांगल्याप्रकारे राबविण्यात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांसह अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील अधिकाधिक ग्रामस्थ सहभागी होतील, यादृष्टीने नियोजन करून या मोहिमेत सर्वांचा सहभाग घ्यावा व ग्रामीण भागात ही मोहीम यशस्वी करावी.
बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75502 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top