
वाहतूक मार्गात बदल
वारकऱ्यांच्या वाहनांना
पथकरातून सूट
कोल्हापूर ः पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ७ ते १५ जुलै या कालावधीसाठी ही सवलत मिळणार आहे. याकरीता भाविकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. संबधित वाहनांना पास देण्यात येणार आहेत. हे पास सवलतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी भाविकांनी संबधित कार्यालयाशी संपर्क साधून टोल फ्री पास घेऊन जावेत असेही पोलिसांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाणी मीटरची चोरी
कोल्हापूर ः देवकर पाणंद येथील एका अपार्टमेंटमधील चोरट्याने पाणी मीटर चोरून नेले. हा प्रकार ५ ते ८ जुलै दरम्यान घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. हा प्रकार २ जुलैला भरदिवसा घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
--
वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
कोल्हापूर ः आपाचीवाडी पसिसरातील रस्त्यावर आज सकाळी एका वृद्ध व्यक्तीला अचानक चक्कर आली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांचा दुपारी मृत्यू झाला. सालापू नाना राव (वय ५८, रा. विशाखापट्टणम) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75508 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..