फये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फये
फये

फये

sakal_logo
By

फये प्रकल्प भिंतीचा
भराव खचला नाही
---
धरण पूर्णपणे सुरक्षित, पाटबंधारे विभागाची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः फये प्रकल्पाच्या भिंतीचा भराव खचला नसून, धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. मुख्य विमोचकाच्या उर्ध्व बाजूकडील हेडवॉलजवळील कोणताही माती भराव खचलेला नसल्याने धरणास कोणताही धोका नसून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आज पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता महेश चव्हाण यांनी सांगितले.
२०२१-२२ च्या उन्हाळी हंगामात फये लघुपाटबंधारे तलावाच्या मुख्य विमोचकाच्या गळतीचे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन (सावंतवाडी) या ठेकेदारामार्फत करण्यात आले होते. काम मेअखेरीस पूर्ण झालेले असून, त्यानंतर चालू हंगामाच्या पावसाळ्यात साठा करण्याचे नियोजित आहे. धरणातून साठा करण्याचे नियोजन, वेळोवेळी सोडण्यात येणारे पाण्याचे नियोजन धरणाच्या खालील गावांतील लोकांना वेळोवेळी कळविण्यात येईल. मुख्य विमोचकाची गळती तसेच नव्याने काँक्रीटमध्ये बांधून व मुख्य विमोचक विहिरीस बाहेरील बाजूने काँक्रीट व जॅकेटिंगचे काम करून गळती पूर्णपणे थांबवली असून, त्या भोवतीचा भराव करताना थराथराने रोलरच्या सहाय्याने उत्कृष्टरीत्या दबाई करण्यात आली आहे. सद्यास्थितीत धरणातील पाणी न अडविता धरणाच्या सर्व्हिस गेट (सेवाद्वार) उघडून पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यासाठी धरणाचे मुख्य विमोचकाचे सेवाद्वार पूर्णपणे खुले ठेवले असून, विमोचकातून पूर्ण क्षमतेने (१०० क्यूसेक) पाणी खाली सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75521 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..