
संह्याद्री व गुलबर्गा रेल्वे सुरू होणार
सह्याद्रीसह गुलबर्गा
मार्गावर रेल्वे ; लाहोटी
कोल्हापूर ,ता.९ ः बंद असलेली कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे तसेच कोल्हापूर- गुलबर्गा मार्गावर नवीन रेल्वे लवकरच सुरू करणार आहे, असे आश्वासन महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिले. मध्यरेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत झाली. बैठकीत कोल्हापूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर बोरवत, अजय दुबे उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूरसाठी सह्याद्री एक्सप्रेस तसेच कोल्हापूर-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या दोन्ही रेल्वे गाड्या सद्या बंद आहेत. त्या सुरू करण्याची मागणी केली, यावर श्री. लाहोटी यांनी सह्याद्री एक्सप्रेस व सोलापूरऐवजी नवीन मार्ग म्हणून गुलबर्गासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरातून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या गांधीनगर, जयसिंगपूर थांबे घ्यावेत. अशी मागणी केली होती त्याबाबत विचार केला जाईल. असेही श्री लाहोटी यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांची कामेही होणार
रेल्वे प्रवाशांसाठी लिप्टची , एक्सेलटर , एफओबी, सीसीटीव्ही आदी चांगल्या सुविधा विविध रेल्वे स्थानकात करून देण्यात येत आहेत. त्याची कामे गतीने व्हावीत यासाठी सीचना दिल्या आहेत. तर रेल्वे मार्गाचे दुहेरी करणे, नवीन रेल्वे लाईन टाकणे, रेल्वे स्थानकात अशा पायाभूत सुविधांची कामेही हाती घेण्यात येत आहेत. असेही श्री. लाहोटी यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75553 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..