धनंजय महाडिक शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय महाडिक शपथ
धनंजय महाडिक शपथ

धनंजय महाडिक शपथ

sakal_logo
By

फोटो
खासदार महाडिक यांनी
घेतली सदस्यत्वाची शपथ
कोल्हापूरसह राज्याच्या विकासासाठी कटिबद्धतेची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पीयुष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला.
तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा आज दिल्लीत शपथविधी झाला. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्‍वराज महाडिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75555 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..