जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक
जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक

जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक

sakal_logo
By

जोतिर्लिंग सेवा संस्था बिनविरोध
तुरुकवाडी ः भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील श्री जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. संस्था स्थापनेपासून माजी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील भेडसगावकर यांचे वर्चस्व आहे. नवनिर्वाचित सदस्य असे ः लक्ष्मण केशव पाटील, आबासो नामदेव घाटगे, हंबीरराव केशव पाटील, गणपती ज्ञानदेव पाटील, पांडुरंग ज्ञानदेव पाटील, शिवाजी यशवंत पाटील, धोंडिराम दगडू चौगुले, आनंदा चंद्राप्पा चौगुले, जगन्नाथ भागोजी वाघमोडे, आकाराम रामचंद्र तांबे, रामचंद्र पांडुरंग नाईक, हौसाबाई आप्पाजी पाटील, बाळाबाई बाबूराव पाटील.

पाचगाव वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगाव येथे या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आठवीपासून पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी जसे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती- भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या मागास विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यालयीन वेळेत मोफत प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे, अशी माहिती वसतिगृहाचे अधीक्षक विवेक चेचर यांनी दिली. अधिक माहितीसाठी अधीक्षक शंकर चेचर किंवा सहायक आयुक्त समाजकल्याण कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा.

दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
कोल्हापूर : शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य शासनाच्या वतीने ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर कार्यान्वित आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र ज्यांनी अद्याप आपले अर्ज पोर्टलवर सादर केलेले नाहीत, अशा दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलैअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.


२७०१
कौलवमध्ये अंगणवाडीला साहित्य
शाहूनगर ः एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कौलव (ता. राधानगरी) येथे बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्‌घाटन शोभा चौगले व राधानगरीचे काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायतीने अंगणवाडीत बोलक्या भिंती व खेळाचे साहित्य दिले. सरपंच सविता चरापले, उपसरपंच रूपाली परीट, तंटामुक्तचे अध्यक्ष विजय पाटील, स्नेहा पाटील, नम्रता पाटील, वृषाली पाटोळे, सारिका सोनाळकर, डी. जी. पाटील, एम. डी. सुतार, सदाशिव लोहार, गणेश मोरे, दीपक चरापले, प्रा. डॉ. विश्वास पाटील, प्रा. अशोक पाटोळे, ए. के. चौगले, शंकर परीट, आर. जी. चरापले उपस्थित होते. ग्रामसेवक पी. एस. आरडे यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

उमाजी पवार अध्यक्षपदी
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उमाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अस्मिता करपे यांची बिनविरोध निवड झाली. शाळा समितीच्या अन्य सदस्य असे ः प्रवीण तुकाराम पवार, संतोष आनंदा पवार, जमीर मिरासो नायकवडी, सागर विठ्ठल चव्हाण, विलास संदीप करपे, गीता नागरगोजे.

02332
मौनी विद्यापीठात ‘एक कॅडेट, एक झाड’
गारगोटी : येथील मौनी विद्यापीठात कृषी दिन कार्यक्रम झाला. यानिमित्त कर्मवीर हिरे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने कॅप्टन अरविंद चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक कॅडेट, एक झाड’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. विद्यापीठ परिसरात सर्वांनी औषधी वनस्पतींची लागवड करून त्याच्या संगोपनाची शपथ घेतली. या वेळी कॅप्टन अरविंद चौगले, उपप्राचार्य डी. ए. कांबळे, प्रा. सचिन चौगले, प्रा. राजेंद्र देसाई, प्रा. एस. बी. केणे, प्रा. एस. डी. राजरत्न यांच्यासह एनसीसी कॅडेटस् उपस्थित होते.

६९०८
छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सत्कार
घुणकी : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्रणाली मगदूम, अथर्व जाधव, आदित्य सुतार, आदित्य राज पाटील, नेहा जाधव, अमन पठाण, मधुरा तेली, दर्शना पाटोळे, मंगेश शिसाळ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़
अध्यक्ष सुभाष जाधव, संचालक सुनील पाटील व कर्मचाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. पालकांच्या वतीने संतराम जाधव यांनी विचार मांडले. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75582 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..