
टुडे २
34771
गडहिंग्लज : शिवसेनेच्या बैठकीत युवासेना पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देताना विजय देवणे व अवधूत पाटील. शेजारी संतोष चिकोडे, प्रतिक क्षीरसागर, दिलीप माने, रियाज शमनजी आदी.
गडहिंग्लज पालिका
निवडणूक स्वबळावर
शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक : हिंदुत्व व विकासाच्या मुद्यावर लढण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : शिवसेना गडहिंग्लज नगरपरिषदेचे निवडणूक स्वबळावर लढणार आहे. जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीबाबत निर्णय घेतला. हिंदुत्व व विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी स्वागत केले. श्री. देवणे म्हणाले,""पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. विकासकामाची ही शिदोरी घेऊन शिवसैनिकांनी घरोघरी पोचावे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. त्याचे रुपांतर मतदानात करावे. गडहिंग्लज नगरपालिकेवर नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकवू.'' शहर संघटक रियाज शमनजी, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे, प्रतिक क्षीरसागर, रेखा पाटील, बाळू कुंभार, अवधूत पाटील, राजेश सुतार, अक्षय नावलगी, मनिष हावळ, शशिकांत पाटील, केदार डांग, सुनीता पाटील, स्वरुपा पेंडूरकर, विशाल चांदेकर, महेश भमानगोळ, सुशील विभुते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी आभार मानले.
युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड...
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राज कोरवी यांची युवासेना शहरप्रमुखपदी तर सुमित कोरवी व अदित्य संभाजी यांची उपशहरप्रमुखपदी निवड केली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75679 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..