जिल्हा बॅंकेच्या योजनांचा लाभ घ्या : इंचनाळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेच्या योजनांचा लाभ घ्या : इंचनाळकर
जिल्हा बॅंकेच्या योजनांचा लाभ घ्या : इंचनाळकर

जिल्हा बॅंकेच्या योजनांचा लाभ घ्या : इंचनाळकर

sakal_logo
By

जिल्हा बॅंकेच्या योजनांचा
लाभ घ्या : इंचनाळकर
---
पेरणोलीत सभासदांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० : जिल्हा बॅंक कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. या बॅंकेच्या माध्यमातून सभासद, शेतकरी, महिला बचतगट यासह समाजातील विविध घटकांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. समाजातील घटकांनी बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसुली अधिकारी इब्राहिम इंचनाळकर यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथील विठ्ठल मंदिरात महिला बचत गट व सेवा संस्थेचे प्रतिनिधी आणि सभासदांचा मेळावा झाला. या वेळी इंचनाळकर बोलत होते. जिल्हा बॅंकेची पेरणोली शाखा व ‘नाबार्ड’ यांच्यातर्फे उपक्रम झाला.
रोखपाल भैरवी सावंत यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला. वसुली अधिकारी इंचनाळकर म्हणाले, ‘‘बँक सर्वसामान्य, शेतकरी, दूध व ऊस उत्पादकांसह महिला बचत गटांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आली आहे. सर्वसामान्यांनी व शेतकऱ्यांनी ज्या त्या गावातील बॅंकेच्या शाखांना भेट द्यावी आणि बॅंकेच्या योजना व कार्याची माहिती घ्यावी. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ व बॅंकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या सहकार्यामुळे तालुक्याची १०० टक्के वसुली झाली आहे.’’ महिला बचतगटांच्या प्रतिनिधी व उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना इंचनाळकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या वेळी मारुती पोवार, अमित सावंत, मच्छिंद्र कळेकर, सागर देसाई यांच्यासह बचत गटांचे प्रतिनिधी, सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. शाखाधिकारी हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75721 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top