
आजरा ः वीजेच्या धक्क्याने म्हैशीचा मृत्यू
देवकांडगावात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू
आजरा ः देवकांडगाव (ता. आजरा) येथे विजेचा धक्का बसल्याने गुंडू विष्णू मिसाळे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. मिसाळे यांचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग कांबळे यांच्या शेतामध्ये विजेचा खांब आहे. या परिसरात म्हैस चरत होती. या खांबातील वीज वाहक तारेचा स्पर्श झाल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. महसूल विभागाने याचा पंचनामा केला आहे.
चोरट्यांकडून ४ मोबाईल हस्तगत
इचलकरंजी : मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली (वय २१, बंडगर माळ), समीर राजू मुजावर (१९, नेहरूनगर) आणि सचिन श्रीकृष्ण कोपार्डे (३३, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल हस्तगत केले आहेत. तिघांनी चोरीची कबुली दिली असून या कारवाईमुळे ४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
सातवेत कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघे जखमी
सातवे ः येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सदानंद बच्चे (बच्चे सावर्डे), हिंदुराव जाधव (रा. सातवे) दोघे गंभीर जखमी झाले.
येथील आळोबानाथ पेट्रोलियम पंपाजवळून हिंदुराव जाधव शेताकडे जात असताना कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सदानंद बच्चे सातवे येथील बँकेत पैसे येत असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. जखमींना कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तीन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः पिरवाडी (ता. करवीर) परिसरातून एकाच कंपनीच्या तीन मोटारसायकल चोरीला गेल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याबाबतची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75801 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..