उपायुक्तांनी घेतली नागरिकांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपायुक्तांनी घेतली नागरिकांची भेट
उपायुक्तांनी घेतली नागरिकांची भेट

उपायुक्तांनी घेतली नागरिकांची भेट

sakal_logo
By

34859

उपायुक्तांकडून सुतारवाड्याची पाहाणी
पुराच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन ; नालेसफाई कामाचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः चित्रदुर्ग मठ जवळील सुतारवाडा या परिसरातील नागरिकांना संभाव्य पूर व पावसाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने भेटून प्रबोधन केले. वाईल्डर मेमोरियल चर्च न्यू शाहूपुरी भागात उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी जेटिंग कम सक्शन मशीनद्वारे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. नालेसफाई कामाचा आढावाही त्यांनी घेतला. यानंतर परीख पूल येथे पावसाचे पाणी साठणार नाही, यासाठी उपाययोजना म्हणून स्वच्छता विषयक बाबींचा आढावा घेऊन डी वॉटरिंग पंपाच्या व्यवस्थापनेबाबत पाहणी केली.
या ठिकाणी दैनंदीन गटरची व नाल्याची साफसफाई करण्यात येत असून दोन कर्मचारी दोन शिफ्टमध्ये ठेवले आहेत. वाहून आलेला गाळ दैनंदीन नाल्यातून काढण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास परिख पुलाखाली पाणी साठू नये म्हणून पाणी उपसा पंप ठेवला आहे. या ठिकाणी पंपाद्वारे पाणी उपसाकरण्याबाबत ट्रायल ही घेतली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शहरात संततधार पावसामुळे कोठेही चौकात अथवा रस्त्यावर पाणी साठवू नये, म्हणून मेनरोडवरील होल स्वच्छ केल्यामुळे कुठेही पाणी साठलेले नाही. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची सर्व यंत्रणा दिवसरात्र दक्ष राहून काम करत आहे.
--
२०७ तक्रारींची निर्गत
प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून यावर्षी आपत्ती व्यवस्थापनासाठी वॉर रूम सुरू केली. या वॉर रूमद्वारे शुक्रवारअखेर २०७ तक्रारींची निर्गत केले आहेत. शहरातील कचरा उठाव तोडलेली झाडाचे कटिंग उठाव व आरोग्य विषयक इतर अत्यावश्यक बाबीसाठी १८ ट्रॅक्टर भाड्याने घेऊन युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम ही सुरू केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75821 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top