सुपारीवर विठ्ठल दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपारीवर विठ्ठल दर्शन
सुपारीवर विठ्ठल दर्शन

सुपारीवर विठ्ठल दर्शन

sakal_logo
By

३४८६३

चक्क सुपारीवर
साकारली विठ्ठल-रखुमाई
मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरेची कलाकृती
कोल्हापूर, ता. ९ ः आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कसबा बावडा येथील मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी चक्क सुपारीवर विठ्ठल-रखुमाईचे चित्र साकारले. सलग दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी झाली नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीही विठ्ठलभक्तांना विठ्ठलाचे अनोखे दर्शन घडवताना तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाची कलाकृती साकारली होती.
कलाशिक्षक म्हणून कार्यरत मोरे यांनी आजवर अनेक कलाकृती साकारल्या आहेत. त्यात तांदूळ, तीळ, खडू अशा विविध माध्यमांचा वापर करून त्यांच्या मायक्रो कलाकृती विशेष उल्लेखनीय ठरल्या. मुळात अशांत यांनी शालेय जीवनापासूनच रांगोळी स्पर्धेत भाग घ्यायला सुरवात केली. तीन वर्षांपूर्वी खडूमध्ये त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सर्वात छोटा एक इंचाचा पुतळा साकारला होता. मायक्रो कलाकृतींसाठी विशेष ब्रशच्या वापराबरोबरच मोठी मेहनत घ्यावी लागते. आकाराने एकदम लहान असल्याने संयमाने विशेष काळजी घेऊनच या कलाकृती साकाराव्या लागतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75825 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..