आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ
आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

sakal_logo
By

34872
---------
आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ
इचलकरंजी, ता. १० ः श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली. यंदाचे ३२ वे वर्ष आहे.
प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटनेतर्फे उपक्रमाचे आयोजन केले जाते. प्रारंभी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते केले. प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी आंतरशालेय स्पर्धांचा उद्देश स्पष्ट केला. प्रास्ताविक युवक अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अनिल अवसरे यांनी केले. आभार मयूर शेंडगे यांनी मानले. पहिली ते दहावीतील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुद्धिबळ, वक्तृत्व, पाठांतर, गायन, वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. उमाकांत कोळेकर, विजय खटावकर, मधुकर खटावकर, नारायण काकडे, चंद्रकांत पाडळकर, अशोक बारटक्के, राजेंद्र वडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75850 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..