
विश्वशांतीसाठी गडहिंग्लजला प्रार्थना
34888
गडहिंग्लज : बकरी ईदनिमित्त नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देताना मुस्लिम बांधव. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
विश्वशांतीसाठी गडहिंग्लजला प्रार्थना
बकरी ईदचे निमित्त; दोन टप्प्यात नमाज पठण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. पावसाळी वातावरण असल्यामुळे ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण झाले नाही. त्याऐवजी शहरातील पाच मशिदीमध्ये दोन टप्प्यात नमाज पठण करण्यात आले. विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
मुस्लिम बांधव बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात. यानिमित्त दरवर्षी येथील ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण केले जाते. पण, गेल्या चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. आज सकाळीही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण झाले नाही. त्याऐवजी शहरातील सुन्नी जुम्मा मशिद, मरकज मशिद, मदिना मशिद, आयेशा मशिद आणि अमिना मशिद येथे नमाज पठण झाले. मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असल्याने दोन टप्प्यात नमाज पठण करण्यात आले. मौलाना मेहमूद रजा, मौलाना फईम मुल्ला, मौलाना मुबीन नदाफ, हाफिज सद्दाम खलिफ, हाफिज मुबारक नाईकवाडे यांनी नमाज व खुतबा पठण केले. त्यानंतर सामाजिक सलोखा, विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना झाली.
दरम्यान, नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी आषाढी एकादशीचा प्रसाद देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नदीम शेख यांनी आभार मानले. राजू खलिफ, प्रा. आशपाक मकानदार, युनूस नाईकवाडे, कबीर मुल्ला, हरुण सय्यद, मौलाना अजिम पटेल, पी. एस. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.
----------------
चौकट
हलकर्णी परिसरात उत्साह
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून संततधार पाऊस असल्यामुळे ईदगाह मैदानाऐवजी मशिदीमध्ये नमाज व खुदबा पठाण झाले. मौलाना महंमद मकानदार यांनी ईदचे महत्व सांगितले. सुख-समृद्धी लाभू दे, पिके चांगली येऊ देत यासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम सुन्नतचे अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, नजीर बागवान, निजाम पानारी, हाजी लायकाली मालदार, इस्माईल यमकनमर्डी, जुबेर यरगटी, आप्पासाहेब यमकनमर्डी, गैबू कोणकेरी, असगरअली बागवान, अल्ताफ मुल्ला, राजमहमंद खलिफा, शकील पट्टणकुडी, नूर मकानदार, महमंद हनिफ ताशिलदार, नजीर कादरभाई, गुंडू तब्बलजी, हमीद पानारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75863 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..