मिरची रोपांची आवक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरची रोपांची आवक वाढली
मिरची रोपांची आवक वाढली

मिरची रोपांची आवक वाढली

sakal_logo
By

34906
गडहिंग्लज : गुणे गल्लीतील रोप बाजारात वांगी रोपांची खऱेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)


बिन्स, फळांचे भाव तेजीत
फळभाज्यांचे दर पुर्ववत; रोपांची आवक वाढली, डॉली शेंगाचे दर वधारले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : गेला आठवडाभर सुरु असलेल्या दमदार पाऊसामुळे आज आठवडा बाजारात मिरची रोपांना मागणी वाढली. खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होती. भाजीमंडईत आवक वाढल्याने तीन महिन्यानंतर फळभाज्यांचे दर पुर्ववत झाले आहेत. तुलनेत बिन्स, डॉली शेंगाचे दर तेजीत आहेत. फळबाजारात सर्वच फळांची आवक जेमतेम असल्याने दर चढे आहेत. जनावरांच्या बाजारात पावसामुळे शेळ्या, मेंढ्या, म्हैशींची आवक कमी होती.
जूनपासून मान्सुन लाबंल्याने यंदा खरीप हंगामातील पेरणी देखील उशिरा झाली. साहजिकच विविध फळभाज्या, मिरचीची लावण देखील खोळंबली होती. गेला आठवडाभरापासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने रोप बाजारात उलाढाल वाढली. पंधरा दिवसापासून रोपे दर आठवड्याला आणून परत नेण्याची वेळ आल्याची माहिती ब्याळकुडचे (ता.चिकोडी) रोप विक्रेते शंकर पाच्छापूरे यांनी सांगितले. आज सकाळपासूनच शेतकऱ्यांची गुणे गल्लीत रोप खरेदीसाठी गर्दी होती. जवारी मिरचीला मिळणाऱ्या विक्रमी दरामुळे या रोपांना अधिक मागणी होती. मिरचीसह कांदा, वांगी, टोमँटो रोपांचे जातीनुसार २० ते ५० रुपयापर्यंत पेंढीचा दर होता.
उन्हाळ्यामुळे आवक घटल्याने गेले तीन महिने फळभाज्यांचे दर कडाडले होते. सरासरी ८० ते १०० रुपयांवर किळकोळ बाजारात दर पोहचले होते. पण, आता पाऊसामुळे आवक वाढू लागल्याने दर उतरत पुर्ववत झाले आहेत. सरासरी किळकोळ बाजारात ४० रुपये किलो असा दर आहे. खासकरुन वांगी, हिरवी मिरची, टोमँटो यांचे दर घसरले आहेत. दोडका, प्लॉवर, मिरची, वांगी यांचे दहा किलोचा दर ३०० रुपयावर आला आहे. मेथी, कोंथिबिर यांची स्थानिक आवक सुरु झाल्याने १०० पेंढ्याचा दर ५०० रुपयांवर होता. फळबाजारात गेल्या महिन्यापासून आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. जनावरांच्या बाजारात गेला आठवडाभर कोसळणाऱ्या पाऊसामुळे आवक कमीच होती. शेळ्या मेंढ्याची १०० हुन अधिक, तर म्हैशींची सुमारे ६० आवक असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
------------
चौकट..
ओला खजूर दाखल
फळबाजारात ओला खजूर दाखल झाला आहे. लाल आकर्षक रंगाचे हे लहान फळ गोड, तुरट चवीचे असून ग्राहकांचा खरेदीला प्रतिसाद आहे. ४०-५० रुपये किलो असा दर आहे. सफरचंद, मोसंबी यांची आवक कमी असल्याने दर अधिक आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75881 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top