
दौलत-अथर्व कारखान्याचे सात लाख टनाचे उद्दिष्ट
34990
हलकर्णी : अथर्व- दौलत कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी युनिट हेड ए. आर. पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी.
दौलत-अथर्व कारखान्याचे
सात लाख टनाचे उद्दिष्ट
कारखान्यात मिल रोलरचे पूजन
सकाळ वृ्त्तसेवा
चंदगड, ता. १० : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड कंपनी संचलित दौलत कारखान्यात युनिट हेड ए. आर. पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम झाला. या हंगामात सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
पाटील म्हणाले, ‘‘कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाने गेले तीन हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. गत हंगामात पाच लाख ४१ हजार टन गाळप करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी, वाहतूक यंत्रणेची बिले तसेच कामगार पगार वेळेत केल्यामुळे विश्वासाचे वातावरण आहे. आगामी काळात हा कारखाना राज्यात आदर्शवत ठरेल अशा प्रकारे नियोजन राबवले जात आहे. चालू हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाने तोडणी व वाहतुक यंत्रणेचे चोख नियोजन केले आहे. ट्रॅक, ट्रॅक्टर तसेच छकड्यांचे एकूण ६०५ करार केले आहेत. या यंत्रणेला पहिली उचलही दिली आहे. सध्या कारखान्यातील यंत्रसामुग्रीची देखभाल- दुरुस्ती सुरू आहे. शासनाच्या धोरणानुसार वेळेत कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. कारखान्याकडे या वर्षी कार्यक्षेत्रातील १३ हजार ३९० हेक्टरवरील ऊस पिकाची नोंद झाली आहे. सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ ठेवून नियोजन राबवले जात आहे.’’ या वेळी संचालक विजय पाटील, सचिव विजय मराठे, इंजिनिअरींग हेड पी. बी. पाटील, प्रोसेस हेड दिलीप पाटील, डेप्युटी चीफ इंजिनिअर सुनील तळंदगे, केन मॅनेजर सदाशिव गदळे, डिस्टीलरी मॅनेजर विजयकुमार पाटील, एचआर मॅनेजर जी. एस. पाटील, इंजिनिअर दीपक शिंदे, डेप्युटी फायनान्स मॅनेजर ओंकार शिंदे, कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
चौकट
आसवानी प्रकल्पाचा लाभ...
कारखान्याने गतवर्षी ७० केएलपीडीचा आसवानी प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वीत केला. या उपपदार्थ प्रकल्पामुळे आर्थिक लाभ होणार असून त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75944 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..