चंदगडला दिंडी, हरीपाठ वाचन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला दिंडी, हरीपाठ वाचन
चंदगडला दिंडी, हरीपाठ वाचन

चंदगडला दिंडी, हरीपाठ वाचन

sakal_logo
By

34993
डुक्करवाडी : आषाढी एकादशीनिमित्त अंगणवाडीतील लहानग्यांनी काढलेली वारकरी दिंडी.

चंदगडला दिंडी, हरिपाठ वाचन
चंदगड, ता. १० : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रखुमाई आणि श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा मेळा जमलेला असताना इकडे गावागावांतून भक्तांनी ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा, नैवेद्य वाटप करून, दिंड्या काढून आणि हरिपाठ वाचून या आनंद सोहळ्यात सहभाग नोंदवला. गावागावांत वारकरी परंपरा असलेली घराणी आहेत. याच श्रद्धेतून ग्रामदेवतेबरोबरच अनेक ठिकाणी विठ्ठल-रखुमाई मंदिरांची स्थापना झाली आहे. वर्षभर अभंग, कीर्तन, भजनातून आध्यात्मिक भाव जोपासला जातो. आषाढी आणि कार्तिक वारी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यापैकी आषाढी वारीला विशेष महत्त्व आहे. तालुक्यातून पायी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांची तसेच आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते गावातच ग्रामदेवतेच्या मंदिरात किंवा विठ्ठल-रखुमाई मंदिरात भजन, कीर्तन करून सहभागी होतात. तालुक्यात विविध गावांत आज अशा प्रकारे आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढून आषाढीचे महत्त्व अधोरेखित केले. विठ्ठल- रखुमाईसह वारकरी वेषात सहभागी झालेल्या चिमुरड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यातून आध्यात्मिक भाव जोपासण्याचा प्रयत्न झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75947 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..