
ईद उलफित्र एकत्रिपणे
35012
विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मतेची प्रार्थना
बकरी ईदनिमित्त शहरातील विविध ठिकाणी सामूहिक नमाज पठण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : मुस्लिम बोर्डिंगतर्फे पारंपरिक पद्धतीने बकरी ईद (ईदुल अजहा) उत्साहात सर्व धर्मीयांनी मिळून साजरी केली. रमजान ईदसाठी पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशाद कुन्नूरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन, नमाजपठण केले. दुसऱ्या जमातच्या नमाजाकरिता हाफीज आकिब म्हालदार तर तिसरी जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. राष्ट्रीय एकात्मता व विश्वशांतीसाठी या वेळी प्रार्थना झाली.
यासाठी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लक्ष्मीपुरी ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक दिलीपकुमार बर्गे, वसंत मुळीक, ओबीसी संघटना शहराध्यक्ष बापूसो मुल्लानी, प्रकाश पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी स्वागत केले. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. सर्वांनी मिळून कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता तसेच सुखशांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहॉंगीर अत्तार, रफिक शेख, रफिक मुल्ला, फारुक पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुरम्याचे वाटप करण्यात आले.
सर्व मुस्लिम कुटुंबीयांत ईदनिमित्त उत्साहाचे वातावरण होते. सोशल मीडियावरून तर प्रत्यक्ष भेटून ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76030 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..