इचल : पाणी पातळीत दीड फुटाने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : पाणी पातळीत दीड फुटाने वाढ
इचल : पाणी पातळीत दीड फुटाने वाढ

इचल : पाणी पातळीत दीड फुटाने वाढ

sakal_logo
By

35057

इचलकरंजी : पंचगंगा नदी येथे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.

इचलकरंजीत पंचगंगेच्या
पातळीत दीड फुटाने वाढ

आपत्कालीन यंत्रणा सतर्क

इचलकरंजी, ता.१० : विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने २४ तासांत इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी दीड फुटाने वाढली.
या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज पंचगंगा नदीस भेट देऊन पाहणी केली. व आपत्कालीन यंत्रणेमधील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सूचना केल्या. मात्र पुराच्या पाण्यात वाढ होत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. तर आपत्कालीन यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. गुरुवारी व शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याच्या पातळीत एक फुटाने घट झाली होती. मात्र शनिवारी व रविवारी पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५८.६ फुटांवर गेली. पातळीत दीड फूटची वाढ झाली असून पुन्हा पुराचे पाणी जुन्या पुलाला स्पर्श करीत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. दरम्यान, पुराचे पाणी पहाण्यासाठी नागरिक गर्दी करीत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76038 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top