विकासकामांचे जखेवाडीत लोकार्पण; आमदार मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामांचे जखेवाडीत लोकार्पण; आमदार मुश्रीफ
विकासकामांचे जखेवाडीत लोकार्पण; आमदार मुश्रीफ

विकासकामांचे जखेवाडीत लोकार्पण; आमदार मुश्रीफ

sakal_logo
By

gad1019.jpg
जखेवाडी : ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‍घाटन विधवा माता-भगिनींच्या हस्ते झाले. शेजारी हसन मुश्रीफ, सतीश पाटील, उदय जोशी, टी. के. पाटील, सुवर्णा दोरुगडे, सौ. मंजली चौगुले आदी.

विकासकामांचे जखेवाडीत लोकार्पण
मुश्रीफ यांची उपस्थिती; सहा कोटींची कामे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : जखेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे २५ लाख रुपये खर्चून बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण विधवा माता-भगिनींच्या हस्ते झाले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी मुश्रीफ यांच्या हस्ते गावातील सहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण झाले.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘बावीस वर्षांपासून रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यात यश मिळाले. त्याचे आत्मिक समाधान मोठे आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामित्वाचा, मानवतेचा, समानतेचा विचार आणि संदेश महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला आणि जगाला दिला. त्या विचारांतूनच विधवा माता-भगिनींना मानसन्मानाने जगता यावे म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले. पतीच्या मृत्यूनंतर महिलेला कुटुंबासह समाजातही हिनपणाने वागविले जाते. म्हणूनच शासनाने विधवा कुप्रथा बंदीचा निर्णय घेतला.’’
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, गटविकास अधिकारी शरद मगर यांचीही भाषणे झाली. माजी सरपंच भीमराव राजाराम, उदय जोशी, सरपंच टी. के. पाटील, उपसरपंच सुवर्णा दोरुगडे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. सरपंच टी. के. पाटील यांनी स्वागत केले. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक मंजली चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76055 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..