निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

निधन वृत्त

३४९९४
जनाबाई शिवणगेकर
चंदगड ः विंझणे (ता. चंदगड) येथील जनाबाई नारायण शिवणगेकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच चंद्रकांत शिवणगेकर यांच्या त्या आई होत.

35114
बाय्याक्का कदम
वडणगे ः निगवे दुमाला (ता. करवीर ) येथील बाय्याक्का मारूती कदम ( वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ११) आहे.

35081
रवींद्र आजरी
गडहिंग्लज : येथील गांधीनगरातील रवींद्र आप्पासाहेब आजरी (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गडहिंग्लज अर्बन बँकेचे ते संचालक तर गांधीनगर को-ऑप हौंसिंग सोसायटीचे माजी संचालक होते.

35082
बाळगोंडा पाटील
गडहिंग्लज : येथील काळभैरी रोड परिसरातील बाळगोंडा निजगोंडा पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

०१०२२
ज्ञानदेव शिंदे
भुये : कांडगाव (ता. करवीर) येथील ज्ञानदेव सातापा शिंदे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सद्‌गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांचे शिष्य होत. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ११) आहे.

०२८७०
भीमराव कुंभार
उत्तूर ः येथील कुंभार गल्लीतील भीमराव रक्माणा कुंभार (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवार (ता. १२) आहे.

०२७०५
सार्थक डांगे
शाहूनगर ः भोगावती (ता. करवीर) येथील सार्थक सचिन डांगे (वय १२) यांचे निधन झाले. सचिन डांगे यांचे ते चिरंजीव होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.११) आहे.

०१३७१
सदाशिव सुतार
बिद्री : सोनाळी (ता. कागल) येथील सदाशिव सात्तापा सुतार (वय ८६) यांचे निधन झाले. त्याच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ११ )आहे.

02258
मारुती पाटील
सिद्धनेर्ली ः शंकरवाडी येथील मारुती बाबू पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.


02380
अनिल पाटील
माजगाव : करंजफेण (ता. पन्हाळा) येथील अनिल यशवंत पाटील (वय ३९) यांचे निधन झाले. माजी ग्रा. पं. सदस्य सुनील पाटील यांचे ते बंधू होत.
त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११)आहे.

३५०८४
राधिका पाटील
कोल्हापूर : गोळीबार मैदान, शिवशक्ती कॉलनी, कसबा बावडा येथील श्रीमती राधिका कृष्णा पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, मुले, नातू असा परिवार आहे.

३५०८६
कमलाकर मोरे
कोल्हापूर : राजारामपुरी येथील कमलाकर तुकाराम मोरे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे. पार्सल विभागातील सहकारी गणेश मोरे यांचे ते वडील होत.

03494
सुरेखा कर्वे
जयसिंगपूर : उदगाव (ता.शिरोळ) येथील सुरेखा अनिल कर्वे (वय ४०) यांचे आकस्मिक निधन झाले. यांच्या मागे पती, मुलगी, मुलगा सासू असा परिवार आहे.

01362
आदिनाथ खोत
रुकडी: येथील माजी उपसरपंच आदिनाथ अप्पासो खोत (वय ७६ ) यांचे निधन झाले. माजी उपसरपंच शीतल खोत यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.

३५०८९
दत्तात्रेय पाटील
कोल्हापूर : सोनारवाडी (ता. भुदरगड) येथील दत्तात्रेय बळवंत पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.

३५०९१
रुक्मिणी सरनाईक
कोल्हापूर : सनगर गल्ली, रविवार पेठ येथील श्रीमती रुक्मिणी कोंडिबा सरनाईक (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76072 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..