खासगी वाहतूक मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी वाहतूक मालिका
खासगी वाहतूक मालिका

खासगी वाहतूक मालिका

sakal_logo
By

लोगो आज प्रसिद्ध झालेल्या टुडे १ वरून ( फक्त भाग ३ करणे)

जोडसेवा म्हणून मान्यता देण्याची गरज
शासनाचा दुजाभाव; एसटी महामंडळची प्रवासी सेवा कमकूवत

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः राज्याच्या लोकसंख्या वाढीत स्थलांतरीतांच्या वास्तव्याची भर आहे. अशात बहुतांशी उद्योग, व्यवसाय शहरी भागात आहेत. त्यामुळे व्यवहाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातून शहरी भागात रोजची ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची संख्या वाढती आहे. प्रवाशांच्या प्रवासाची पूर्ण गरज भागवण्याची सार्वजनिक वाहतुकीची क्षमताच कमकवून झाली आहे. परिणामी प्रवासी जास्त आणि बस गाड्या कमी तर काही मार्गावर बस गाड्या आहेत पण प्रवासी व महसूल कमी असे चित्र आहे. यासाऱ्यातून सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा बोजवारा उडाला. तरीही खासगी प्रवासी वाहतूक वर्षानुवर्षे बेकायदेशीर ठरवली गेली. याचा पूर्नविचार करून काही अटी शर्तीवर खासगी वाहतुकीला अधिकृत वाहतुकीचा दर्जा देण्याची गरज आहे.
राज्यात लघु व दिर्घपल्ल्याचा टप्पे वाहतुकीची प्रवासी सेवा देण्याची मान्यता फक्त एसटी महामंडळाला आहे. त्या एसटी महामंडळाकडे १८ हजार बसगाड्या आहेत. राज्याची एकूण लोकसंख्या ११ कोटी ४२ लाख. त्यातील अवघ्या ७३ लाख प्रवाशांची गरज एसटी रोज भागवते. यातच एसटी महामंडळाने काही खासगी कंपनीच्या बस कंत्राटी पद्धतीने घेऊन प्रवासी वाहतूक देते. यात एसटीच्या हक्काच्या महसुलातील २५ ते ३५ टक्के महसुलाचा वाटा खासगी कंपन्यांना द्यावा लागतो. एसटीची खासगी ठेकेदारांची बस सेवा अधिकृत व कायेदशीर मानली जाते.
या उलट गावोगावी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपच्या खासगी वाहतूकदारांची वाहतूक बेकायदेशीर ठरवली जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणे, नियमांची बंधने अधिक घट्ट करणे असा दुजाभाव शासनाकडून केला गेला.
तरीही प्रवाशांची प्रवासाची गरज भागत नाही तेव्हा अनेक प्रवासी एसटी सोडून खासगी गाडीने प्रवास करतात. यातून राज्यात खासगी प्रवासी वाहतूक वाढली. खासगी वाहतूकीतून शासनाला महसूल मिळत नाही. शासनाची सद्याची प्रवासी सेवा तुटपुंजी आहे. त्यामुळे खासगी वाहतूक सेवेला जोडसेवा म्हणून त्याला मान्यता दिल्यास राज्यभरातील प्रवाशांची सोय होईल.
अनेक वर्षात खासगी वाहतूक बेकायदेशीर ठरवण्याचा व बड्या ठेकेदारांचा लाभ करून देण्याचा प्रयत्न झाला. यातून वीस वर्षांत खासगी वाहतूक अधिकृत झालेली नाही. अशात एसटी कमकवूत झाली, नव्या गाड्या घेण्याची ऐपत नाही. राज्यातील प्रवाशांची गरज भागत नाही. त्यामुळे खासगी वाहतुकीला मान्यता देण्याबाबत शासनाला सकारात्मक विचार करावा लागेल असे ठळकपणे दिसत आहे.

ठळक चौकट
एसटी महामंडळाच्या बस- १८०००
खासगी वाहतुकीच्या गाड्या- १ लाख १० हजार
रोजची प्रवासी संख्या- ७३ लाख
खासगी वाहतूक प्रवासी संख्या- २५ ते ३० लाख
खासगी वाहतूकीवर अवलंबीत कुटूंब ५ लाख

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76090 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top