पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

35115
बुरंबाळ (ता. शाहूवाडी) ः ओढ्यावरील पुलाची पाहणी करताना सर्जेराव पाटील आदी.

कांटे-बुरंबाळ पुलाची डागडुजी
आमदार विनय कोरे दुरुस्तीसाठी निधी देणार
सकाळ वृत्तसेवा
करंजफेण, ता. १० ः बुरंबाळ (ता. शाहूवाडी) येथील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुराच्या भरावाची तात्पुरती डागडुजी करून ग्रामपंचायत प्रशासनाने मार्ग सुरू केला आहे. पुलासाठी आमदार विनय कोरे यांच्या निधीतून पाच ते सहा लाखांचा निधी खर्च करून स्लॅब टाकण्याचे काम लवकरच करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी पुलाची पाहणी करताना सांगितले.
कासारी खोऱ्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांटे-बुरंबाळ दरम्यानच्या ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने बुरंबाळ ग्रामस्थांची दळणवळणाची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुलाच्या दुरुस्तीची ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन पुराच्या भरावाची तात्पुरती डागडुजी करून ग्रामपंचायत प्रशासनाने सरपंच अशोक बारस्कर व उपसरपंच मारुती पाटील यांच्या सहकार्याने मार्ग सुरू केला आहे.
त्यामुळे विद्यार्थी, तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे; परंतु या पुलातून पाण्याचा विसर्ग प्रचंड असल्याने पक्के बांधकाम होणे गरजेचे असल्याने या ठिकाणी सर्जेराव पाटील यांनी श्री. कोरे यांच्याशी फोनवरून संवाद साधून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या वेळी आमदार कोरे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तत्काळ निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. ‘नाबार्ड’मधून नवीन पुलासाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे संगितले. या वेळी युवराज पाटील, रामचंद्र पाटील, सचिन आग्रे, बळीराम पाटील, धोंडिराम अतिग्रे, शशिकांत आयरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76094 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top