
मांगलेवाडीतील अनधिकृत गाळे काढा
35186
गडहिंग्लज : वडरगे रस्त्याच्या कामाबाबत निवेदन देताना डॉ. अनिल कुराडे, अमर मांगले, डॉ. महेश चौगुले, भीमराव माने, शुभम नलवडे आदी.
मांगलेवाडीतील अनधिकृत गाळे काढा
नागरिकांची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : वडरगे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, मांगलेवाडीच्या कोपऱ्यावर दोन अनधिकृत गाळे आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. सदरचे गाळे लवकरात लवकर काढून रस्त्याचे काम पूर्ण करावे. विकासकामांच्या आड कोण येत असेल, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मांगलेवाडी व वडरगे रोड परिसरातील नागरीकांनी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांना याबाबतचे निवेदन दिले.
साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून वडरगे रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी नागरीकांच्या सोईसाठी इतका मोठा निधी दिला आहे. मांगलेवाडी कोपरा येथे दोन अनधिकृत गाळे ठेवले आहेत. या गाळ्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदरचे गाळे निघणार म्हणून चुकीची माहिती देऊन रस्त्याचे काम बंद पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. नागरीकांच्या सोईचे काम होत असताना विनाकारण त्या कामात अडथळा निर्माण करू नये. तसेच अनधिकृत गाळे काढून घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे. या कामात कोणी राजकीय लोक अडथळा आणत असतील तर सदरची बाब खपवून घेतली जाणार नाही. विकासकामाच्या आड येणाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
जयवंत अस्वले, अमर मांगले, डॉ. अनिल कुराडे, भीमराव माने, शुभम नलवडे, डॉ. महेश चौगुले, चिंतामणी वाली, श्रीकांत पोवार, तानाजी आगलावे, प्रेमला खोत, परशराम रोटे, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब सावंत, एल. डी. पोवार, आर. डी. डोमणे, रमाकांत शिंदे, अशोक वाली, सागर वाली, इरफान मुजावर यांच्यासह नागरीकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76183 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..