पाच तासात केला वीज पुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच तासात केला वीज पुरवठा सुरळीत
पाच तासात केला वीज पुरवठा सुरळीत

पाच तासात केला वीज पुरवठा सुरळीत

sakal_logo
By

35195
गिजवणे : झाड कोसळल्याने पडलेला खांब पुन्हा उभा करताना ‘महावितरण’चे कर्मचारी.

पाच तासांत केला
वीज पुरवठा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्याकडेला असणारे झाड कोसळले होते. यात विजेचे दोन खांब कोसळले, शिवाय आठ गाळ्यांतील कंडक्टर तुटला होता. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत पाच तासांत वीज पुरवठा सुरळीत केला.
गिजवणेजवळ रविवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास हे झाड कोसळले. वीज वाहिन्यावर झाड कोसळल्याने गडहिंग्लज फिडरचे दोन खांब पडले. आठ गाळ्यातील कंडक्टर तुटला. पावसाची रिपरिप सुरूच होती. अशा परिस्थितीत गिजवणे शाखा कार्यालय व अन्य शाखांतील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रामीण’चे शाखा अभियंता अजित पवार, गडहिंग्लज शहरचे शाखा अभियंता चिकोडे, दुंडगे शाखेचे अभियंता खांडेकर यांनी नियोजन केले. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना केदारनाथ इलेक्ट्रिकल, यशवर्धन इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
सर्वांच्या प्रयत्नातून पाच तासांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. सर्वसाधारणपणे या कामासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. गिजवणे गावात सुमारे १७०० ग्राहक आहेत, तर दहा ट्रान्स्फार्मर आहेत. पाच तासात हे सारे ट्रान्स्फार्मर सुरू करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76190 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top