
महाआरोग्य शिबिराला माणगाव येथे प्रतिसाद
35213
माणगाव ः आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.
महाआरोग्य शिबिराला
माणगाव येथे प्रतिसाद
चंदगड, ता. ११ ः माणगाव (ता. चंदगड) येथे गडहिंग्लज येथील स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे झालेल्या महाआरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर, ईसीजी, पोटाचे विकार, हाडांचे विकार, तसेच लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. माणकेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच बाबूराव दुकळे प्रमुख उपस्थित होते. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजित पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने गडहिंग्लज येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचे सांगितले. डॉ. अमर पाटील हे एमबीबीएस डीएनबी (मेडिसीन) पदवी घेतलेले डॉक्टर या रुग्णालयात चोवीस तास उपलब्ध रहाणार असल्याचे सांगितले. या दोघांसह डॉ. अजित करजगीकर, डॉ. सिद्धी पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. डॉ. संजीव पाटील, डॉ. बाबासाहेब बेनके, डॉ. दयानंद बेनके, डॉ. विलास पाटील, डॉ. नारवेकर, डॉ. पराग जोशी, डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76206 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..