चदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या
चदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

35214
चंदगड : ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देताना नगरसेवक बाळासाहेब हळदणकर व अन्य.

वीज ग्राहकांच्या मीटर दुरुस्तीची
चंदगडमध्ये व्यवस्था करण्याची मागणी
चंदगड : तालुक्यातील ‘महावितरण’च्या ग्राहकांना नादुरुस्त मीटर टेस्टिंग करून घेण्यासाठी गडहिंग्लजला जावे लागत आहे. सर्वच ग्राहकांना गडहिंग्लज येथे जाणे सोयीचे नाही. तेव्हा कंपनीने पूर्वीप्रमाणे ही सोय चंदगडमध्येच करावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केली आहे. कंपनीच्या येथील अभियंत्यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले. अनेक गावांत डीपीचे बॉक्स खराब झाले असून ते बदलण्याची गरज आहे. वीजवाहिनी झाडाच्या फांद्यांना घासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याकडेही कंपनीने लक्ष देऊन झाडाच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी केली आहे. निवेदनावर कलीम मदार, हनीफ सय्यद, शहाबुद्दीन नाईक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------
पंचायत समितीसाठी आरक्षण
सोडत चंदगड मध्यवर्ती इमारतीत
चंदगड : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी (ता. १३) होणार आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. तहसीलदार विनोद रणावरे यांनी ही माहिती दिली. चक्रानुक्रमाने आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यावर शुक्रवारी (ता. १५) त्याचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्याबाबत काही हरकती असल्यास २१ तारखेपर्यंत जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे दाखल करायच्या आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
‘माडखोलकर’मध्ये विविध कार्यक्रम
चंदगड : येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १४ तारखेला वक्तृत्व स्पर्धा होतील. १५ तारखेला सामान्यज्ञान स्पर्धा होतील. ३० तारखेला सामाजिक व व्यक्तिचित्र प्रकारातील रांगोळी स्पर्धा होतील. २७ तारखेला पदवीधरांच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा होईल. १ ऑगस्टला कर्मचारी व प्राध्यापकांचा स्नेहमेळावा होईल. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76207 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top