निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवड
निवड

निवड

sakal_logo
By

३५२५७,३५२६१, ३५२६२
खंडोबा तालीम मंडळाच्या
अध्यक्षपदी संदीप डकरे
कोल्हापूर ः श्री खंडोबा तालीम मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप डकरे, उपाध्यक्षपदी सम्राट पाटील तर सचिवपदी संकेत सूर्यवंशी यांची निवड केली. सहसचिवपदी स्वप्नील वणीरे आणि खजानीसपदी अनिरुद्ध निकम यांची निवड झाली. मंडळाच्या २०२२-२३ च्या कार्यकारणी निवडीवेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

००५७७ ०० ५७८
‘पंचगंगा’च्या अध्यक्षपदी अतितकर
प्रयाग चिखली ः आंबेवाडी (ता. करवीर) येथील पंचगंगा सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रम राजेंद्र अतितकर यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी बाबुराव काटकर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सहकारी अधिकारी एस. बी. कुलकर्णी होते.
संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आभार सचिव शिवाजी कुशिरकर यांनी मानले. बिनविरोध निवड झालेले संचालक असे ः सर्वसाधारण गट प्रकाशराव शिंदे, शंकरराव पवळ, वसंतराव पाटील, पापालाल मुजावर, दत्तात्रय अंबी, नितीन चव्हाण, विठ्ठल पाटील, पांडुरंग तांबेकर, मीनाक्षी आंबी, भारती पठाडे.

३०१८
प्रोत्साहन अनुदान तात्काळ द्या
राधानगरी ः प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा आघाडी सरकारने केली होती. मात्र युती सरकारने हा निर्णय रद्द केला असून शेतकऱ्यांना तत्काळ हे अनुदान द्यावे. या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी नायब तहसीलदार अतुल काकडे यांच्याकडे दिले. एक जुलैपासून प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अंमलबजावणी होणार होती. सरकार बदलल्याने निर्णय अर्ध्यावरच लटकला. आता शिंदेंसेना व भाजपचे सरकार नवीन सत्तेवर आले आहे. नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने तत्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. के. द. पाटील, आर. बी. चरापले, वंचित आघाडीचे नेते संजय कांबळे, मारुतराव चौगले, निवास चरापले, चंद्रकांत पाटील, दिगंबर येरुडकर,आनंदराव पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते.


१६६३
अध्यक्षपदी राम भोसले
बोरपाडळे : रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या अध्यक्षपदी राम भोसले यांची निवड झाली. माले व परिसरातील गावांसाठी ॲम्बुलन्स तसेच पंचक्रोशीतील शाळांमध्ये ई-लर्निंग प्रोजेक्ट इत्यादी रोटरी क्लबकडून सामाजिक कामे केली आहेत. रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट अतिशय जोमाने केली आहेत. भोसले यांचे मूळगाव चिकुर्डे असले तरी मालेतील विविध सामाजिक कार्यात योगदान लाभत असल्याचे माजी उपसरपंच उत्तम पाटील यांनी सांगितले.

२३३९
तळेमाऊली परिसरात वृक्षारोपण
गारगोटी : खानापूर (ता. भुदरगड) येथील तळेमाऊली जंगल परिसरात आषाढी एकादशीनिमित्ताने पर्यावरणास उपयुक्त असणाऱ्या विविध देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. जंगल परिसरात विविध ताम्हण, बहावा, जांभूळ, हेळा, पेरू, करंज, काटेसावर, आवळा, चिंच अशा शंभर देशी वृक्षांचे रोपण केले. याचबरोबर आंबा, फणस, जांभूळ वृक्षांच्या बियांचे हवाई बीजारोपण केले. या पर्यावरणपूरक उपक्रमात सर्पमित्र अवधूत पाटील, सुधीर शिंत्रे, विनायक पाटील, शांताराम कोदले, सामाजिक वनीकरणचे श्री. बिरंबोळे, श्री. बलुगडे, मिथाली पाटील, जान्हवी पाटील आदींनी सहभाग घेतला.

४०८१
जांभळी येथे जनजागृती रॅली
इचलकरंजी : जांभळी (ता.शिरोळ) येथे डेंगी, चिकणगुनीया,मलेरिया रोगांचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती रॅली निघाली. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी,याबाबत नागरिकांना आवाहान करण्यात आले.विद्या मंदिर शाळा नंबर 2 मधील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. डंक छोटा,धोका मोठा; कोरडा दिवस पाळू, डेंगी चिकणगुनीयाला पळवून लावू अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.तसेच गावात आशा वर्कर महिलांनी घरोघरी जावून सर्व्हे केला.या रॅलीत शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य सेविका सौ.नेवेकरी, आशा वर्कर सौ.जयश्री गायकवाड, रुपाली मोरे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76246 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..