लेबर कमिटी बैठकीसाठी दिल्‍लीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेबर कमिटी बैठकीसाठी दिल्‍लीत
लेबर कमिटी बैठकीसाठी दिल्‍लीत

लेबर कमिटी बैठकीसाठी दिल्‍लीत

sakal_logo
By

लेबर कमिटीच्या
बैठकीसाठी दिल्‍लीत
खासदार प्रा. मंडलिक; फुटीचे वृत्त तथ्यहीन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : संसदेच्या लेबर कमिटीचा सदस्य असल्याने कमिटीच्या बैठकीसाठी दिल्‍लीत आलो आहे. बैठकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे. त्यामुळे अफवांवर कोणी विश्‍‍वास ठेवू नये, असे आवाहन खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी केले. मुंबई येथे पक्षाच्या बैठकीस दांडी मारलेल्या सदस्यांमध्ये खासदार मंडलिक यांच्या नावाचाही चर्चा झाली. दांडी मारणारे सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्तही पसरले. मात्र यात काही तथ्य नसल्याचे प्रा. मंडलिक यांनी स्‍पष्‍ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार फुटले. आता खासदारांनाही बंडाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत खासदारांच्या बैठका घेत आहेत. आजही खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस १८ पैकी १२ खासदारांची उपस्‍थिती होती. सहा खासदारांनी बैठकीला दांडी मारली. यात खासदार प्रा. मंडलिक यांचे नाव असल्याचे समजताच कोल्‍हापुरात एकच खळबळ उडाली. खासदार मंडलिक यांच्या समर्थकांसह काँग्रेस, राष्‍ट्रवादीच नव्‍हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनही विचारणा होऊ लागली. एक दिवसापुर्वीच खासादर मंडलिक यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे जाहीर केले होते. असे असताना दुसऱ्याच दिवशी त्यांनी सेना खासदारांच्या बैठकीककडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरु झाली.

सेना खासदारांच्या बैठकीबाबत खा.मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवी दिल्‍ली येथे लेबर कमिटीची बैठक असल्याने या बैठकीस आपण उपस्‍थित राहिल्याचे सांगितले. तसेच मागील काही बैठकींना उपस्‍थित न राहिल्याने यावेळी जाणे आवश्यक होते. अन्य एका कमिटीची बैठकही आज होणार होती. त्यामुळेच पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्या परवानगीने या खासदारांच्या बैठकीस अनुपस्‍थित राहिलो असल्याचेही खा.मंडलिक यांनी सांगितले. तसेच आपण कोणत्याही बंडखोर गटात गेलो नसल्याचे त्यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76303 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top