जीएसटी विभागाकडून दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी विभागाकडून दंड वसूल
जीएसटी विभागाकडून दंड वसूल

जीएसटी विभागाकडून दंड वसूल

sakal_logo
By

१४ लाखांचा दंड
जीएसटी विभागाच्या
पथकाकडून वसूल

कोल्हापूर, ता. ११ : वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने २० ते २६ जून दरम्यान ई-वे बिल तपासणी मोहिम किणी पथकर नाका, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग येथे राबविली. या मोहिमेंतर्गत २०२९५ वाहनांच्या ई-वे बिलची तपासणी केली. त्यापैकी ई-वे बिल नसणाऱ्या २० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यात १४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
देशभरात १ एप्रिल २०१८ पासून ई-वे बिल प्रणाली लागू झाली. यात राज्यांतर्गत १ लक्ष तर परप्रांतात ५० हजारांपेक्षा अधिक किंमतीचा माल वाहतूक करताना वाहनाबरोबर ई-वे बिल असणे बंधनकारक आहे. ई-वे बिल नसल्यास वस्तू व सेवा कर विभागाकडून दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार सहा दिवस कोल्हापूर वस्तू व सेवा कर विभागाने ही मोहीम रात्रंदिवस राबविली.
राज्यकर सहआयुक्त सुनिता पाटील-थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम विभागातील ३० अधिकारी आणि ११० कर्मचाऱ्यांनी राबविली. ही मोहीम अशीच सुरु राहणार असल्यामुळे कर चुकवेगिरी करणाया व्यापाऱ्यानी धसका घेतल्याचे दिसत आहे, अशी माहिती राज्य कर सहआयुक्त (प्रशासन) यांनी पत्रकाद्वारे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76338 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..