कसबा बावडा रेस्क्यू टीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा रेस्क्यू टीम
कसबा बावडा रेस्क्यू टीम

कसबा बावडा रेस्क्यू टीम

sakal_logo
By

३५३३९
बावडा रेस्क्यु फोर्सला
आत्कालीन साहित्य प्रदान
कोल्हापूर ः नैसर्गिक अपत्तीच्या काळात बावडा रेस्क्यु फोर्स जनतेच्या मदतीला धावेल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. बावडा रेस्क्यु फोर्सला टीमला पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
दोन वर्षापूर्वी बावडा रेस्क्यु फोर्सची निर्मिती झाली. सामाजिक उपक्रमात सहभागी असलेल्या बावड्यातील सुमारे सत्तर युवक या रेस्क्यु फोर्समध्ये सहभागी झाले. पुराच्या काळात आणि कोरोना काळात या फोर्सने प्रभावी काम केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही फोर्स नेहमीप्रमाणे मदतीसाठी सर्वात पुढे असेल याची खात्री आहे. मदत कार्यात या फोर्सला कोणतही अडथळा येवू नये, यासाठी लाईफ जॅकेट, स्टेचर, रबरी ग्लोज आदी साहित्य उपलब्ध करून दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. बावडा रेस्क्यु फोर्सच्या कामाचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. समन्वयक मानसिंग जाधव यांनी दोन वर्षातील मदत कार्याची माहिती दिली. तानाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत कांबळे यांनी आभार मानले.
पंकज घाटगे, प्रदीप उलपे, ताौसिफ शेख, नंदू पाटील, जितू कांबळे, विनायक आळवेकर, अशांत मोरे, निलेश पिसाळ आदी उपस्थित होते.
.......
३५३३१
वडणगेच्या ऐश्वर्या पाटीलला सुवर्णपदक
वडणगे ः वडणगे (ता.करवीर) येथील ऐश्वर्या दत्तात्रय पाटील हिने एमएसस्सी कृषी अर्थशास्त्र विषयात अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पहिला क्रमांक पटकावला. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दीक्षांत समारंभात तिला सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. ती सध्या कृषी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. करत आहे. घरच्यांचे पाठबळ आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळवू शकल्याचे ती सांगते.
..........
३५३४१
पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे उद्घाटन
कोल्हापूर ः श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेली १४ वर्षे ट्रस्टतर्फे हे कार्य अखंड सुरू असून, आता ट्रस्टतर्फे महालक्ष्मी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला प्रारंभ झाला आहे.त्याचे उद्घाटन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झाले. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेचे ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. चेतन सुगंधी, राजेश सुगंधी, प्रशांत तहसीलदार आदी उपस्थित होते. या लॅबोरेटरीमध्ये साठहून अधिक तपासण्या करण्यात येणार आहेत. या सर्व तपासण्या अनुभवी पॅथॉलॉजिस्ट व तज्ञ टेक्निशियनद्वारे करण्यात येणार असून, नामवंत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालणार आहे. सर्व तपासण्या अल्प दरात करण्यात येणार असल्यामुळे गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन राजू मेवेकरी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76376 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top