
डेंगी तपासणी पाहणी मोहिम
३५३५३
शहरात ४७० कंटेनरची तपासणी
महापालिकेची मोहीम; डेंगी, चिकनगुणिया सर्व्हेक्षणात सहा घरे दूषित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहरामध्ये डेंगी, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरामध्ये २३७ घरांची तपासणी केली. यामध्ये ६ दूषित घरे आढळली तर ४७० कंटेनरची तपासणी केली. त्यापैकी १८ कंटेनर दुषित आढलेले असून रिकामे न करता येणाऱ्या १ कंटेनरमध्ये १ टक्का टेमिफॉसचे द्रावण टाकले आहे. सर्व्हेक्षण राजेंद्रनगर, सुभाषनगर, हनुमानगर, नेहरुनगर, जरगरनगर, रामानंदनगर, सिध्दार्थनगर, सदर बझार या ठिकाणी किटकनाशक विभागाच्या पथकामार्फत करण्यात आला.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एक वेळा कोरडी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, झाडांच्या कुंड्या, फ्री च्या मागील ट्रे यामध्ये पाणी साचू देऊ नये, संशयीत तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. आपल्या भागामध्ये रक्तनमुने घेण्यासाठी येणा-या आरोग्य कर्मचा-यांना नागरीकांनी सहकार्य करावे असे अवाहन आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76396 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..