
जाहिरात बातमी
35359
विद्यार्थ्यांनी स्वतःचे
कौतुक करावे : प्रा. सावंत
कोल्हापूर, ता. १६ : सावंत कोचिंग क्लासेस, सावंत ॲकॅडमीमधील १० वी/१२ वी बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थी-पालक सभा झाली.
यावर्षी १० वीच्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा अधिक गुणप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या २७, ८५ टक्केपेक्षा अधिक २८ तर ८० टक्केपेक्षा अधिक २२ अशी असून, क्लासमध्ये ९८.२० टक्के गुण मिळवून अथर्व पटेलने प्रथम क्रमांक पटकवला. माजी विद्यार्थीनी ऐश्वर्या नाईकची भूमि-अभिलेख उपअधिक्षक लेखापदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. १० वीमधील यावर्षीचे विद्यार्थी स्वरूपा सुर्वे, अदिती ढेरे, श्रावणी तारळेकर, श्रद्धा मालेकर, जय शिंदे, ज्योती मदने यांनी मनोगत व्यक्त केले. पालक प्रशांत वेदांते, अमर ढेरे, अश्विनी तारळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व पालकांतर्फे संचालक प्रा. सावंत यांचा सत्कार केला.
प्रा. सावंत म्हणाले, ‘‘सर्वात जास्त स्वत:वर प्रेम करावे, त्यामुळे स्वत:वर आपण लक्ष केंद्रीत करून स्वत:चे ध्येय गाठण्यास मदत होते. निरोगी आयुष्य जगता येते. भूतकाळातील स्वत:च्या चुका, नकारात्मकता, नैराश्य. गोष्टी विसरून स्वत:चे कौतुक केल्यास स्वत:ची दिवसेंदिवस प्रगती करता येईल. ’
१० वी च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. १२ वी तील विद्यार्थी पिनाझ शेख (९८.१६), सुहानी शिंदे (९४.५०) आणि सिद्धी आडके (८५.५० टक्के) यांचाही विशेष सत्कार केला. वेदा सोनुले, शुभदा जांभळीकर यांनी सूत्रसंचालन केले. सीमा चैतन्य यांनी प्रास्ताविक केले. शर्वरी पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76400 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..