
पावसाचा जोर वाढला
पावसाचा जोर वाढला
अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटकला सूचना करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. ११ : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. सकाळी सहा ते सायंकाळी आठपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी दोन इंचाने वाढली होता. तर, ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण ५४ टक्के भरले असून, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी येथे मुसळधार पाऊस पडत होता. राधानगरी धरणातू १,३५० क्युसेक तर अलमट्टी धरणातून २,९७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारला सूचना करावी, अशी मागणी कोल्हापूर कार्यकर्ते मंचचे नियंत्रक सर्जेराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर कमी राहिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी दोन इंचाने कमी झाली होती. दरम्यान, आज दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. रात्री नऊपर्यंत कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फुटांपर्यंत होती. तर, राधानगरी धरण ५४ टक्के भरले असून ४.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१६ मीटर होती. याउलट पाऊस आणि पंचगंगा नदीमध्येही पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग झाला पाहिजे, अशी मागणी कार्यकर्ते मंचच्या वतीने केली आहे.
* धरणातील पाणीसाठा व विर्सग
धरण* पाणीसाठा टीएमसीमध्ये* विर्सग (क्युसेकमध्ये)
राधानगरी* ४.५०* १३५०
तुळशी* १.८१* नाही
वारणा* १८.१९ *७६५
दूधगंगा* ११.२२* ६५०
कासारी*१.६९*२५०
कडवी* १.३९*१२०
कुंभी*१.५१*३००
पाटगाव*२.००*२५०
चिकोत्रा*०.८२* नाही
जंगमहट्टी*०.६७*नाही
घटप्रभा*१.५६*४७६५
आंबेओहोळ*०.८१*नाही
कोयना* ३२.५०* नाही
अलमट्टी* ८३.८५* २९७६
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे बंधारे
* बंधारा * पाणीपातळी
राजाराम* ३२.१० फूट
नृसिंहवाडी* ४१.६ फूट
शिरोळ* ४३ फूट
इचलकरंजी* ५८ फूट
तेरवाड* ५२ फूट
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76405 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..