यांत्रिकी रोपलावणीला चंदगडमध्ये मशीनचा खोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यांत्रिकी रोपलावणीला चंदगडमध्ये मशीनचा खोडा
यांत्रिकी रोपलावणीला चंदगडमध्ये मशीनचा खोडा

यांत्रिकी रोपलावणीला चंदगडमध्ये मशीनचा खोडा

sakal_logo
By

35365
मशिनच्या सहाय्याने अशा प्रकारे रोप लावण केली जाते. (संग्रहित छायाचित्र).

यांत्रिकी रोपलावणीला
चंदगडमध्ये मशिनचा खोडा
कृषी विभागाची अगतिकता; शेतकऱ्यांकडे मशिनची संख्या वाढली तरच उद्देश सफल होणार
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ : शेतीमध्ये मजुरांचा तुटवडा आणि वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने तालुका कृषी विभागाने यांत्रिकी रोप लावणीला महत्त्व दिले आहे. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केल्यानंतर या वर्षी सुमारे तीन हेक्टर क्षेत्र निश्‍चित केले आहे; परंतु लागवड करण्यासाठी तालुक्यात एकाही शेतकऱ्याकडे हे मशीन (पॅडी ट्रान्सप्लांटर) नाही. या मशीनची संख्या वाढली, तरच हा उद्देश सफल होणार आहे.
खरिपाच्या हंगामात कोणत्याही पिकाच्या लागवडीची वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचा त्या पिकाच्या उत्पादनावर योग्य-अयोग्य परिणाम होत असतो. तालुक्याच्या पश्‍चिम भागात रोप लावण पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते; परंतु ज्याच्याकडे औत किंवा पॉवर ट्रेलर, ट्रॅक्टर आणि मजुरांची उपलब्धता, तोच वेळ साधण्यात यशस्वी होतो. दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्याची वेळेत लागण होईल, याची खात्री नसते. अर्थातच त्यामुळे उत्पादनात घट येते. हंगामात लागवडीसाठी मजूर मिळत नाहीत म्हणून अनेकांची शेती पडीक आहे. अशा वेळी यांत्रिकी रोप लावण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही मशिन केवळ रोप लावणे एवढ्याच कामासाठी वापरात असल्याने उर्वरित कालावधीत त्याचा उपयोग नाही. मशिनची किंमतही तीन लाख रुपये आहे. त्यामुळे ती खरेदी करण्याची शेतकऱ्याची मानसिकता नाही. मात्र, अशा प्रकारच्या मशिनसाठी शासनाकडून दीड लाख रुपयांचे अनुदान आहे. एखाद्याने व्यावसायिक पद्धतीने मशिनचा उपयोग करायचा ठरवला तर तो एका वर्षात मशिनचे पैसे मिळवू शकतो. स्वतःच्या जागेत भाताचे गादी वाफे तयार करून तरवा पुरवण्यापासून ते रोप लावणीपर्यंतचे काम ठेका पद्धतीने करू शकतो. त्यामुळे मजूर मिळत नाही म्हणून पडीक असलेली जमीन वापरात येईल. अशी जमीन मशिनधारक स्वतःही भाडे पद्धतीने घेऊन उत्पादन घेऊ शकतो; परंतु शेतकऱ्यांकडे मशिन नसल्याने अडचणी येत आहेत.
--------------
दृष्टिक्षेपात
- मशिनची किंमत : तीन लाख रुपये
- एक एकर रोप लागणीसाठी : अडीच तास
- मशिनचे अॅव्हरेज : १ तासाला १ लिटर इंधन
- मनुष्यबळ : तरवा ठेवण्यासाठी एक व मशिन चालवणारा एक
- तरव्याची एक गादी तयार करण्यासाठी : १०० ते १२५ ग्रॅम बियाणे
- १ गुंठ्यासाठी लागणारा तरवा : १ गादी
- दोन ओळीतील अंतर : ३० सेमी
- दोन रोपांतील अंतर : १० ते १५ सेमी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76444 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..