
सत्तेवाडी मार्गे चंदगड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
35367
कानडी : बंधाऱ्यावरील या पाण्यातून प्रवासी प्रवास करतात. सुरक्षितता म्हणून दोन्ही बाजूने लोखंडी संरक्षक कठडे उभारणे गरजेचे आहे.
सत्तेवाडी मार्गे चंदगड रस्ता
दुरुस्त करण्याची मागणी
कानडी बंधाऱ्याला संरक्षक कठड्यांची गरज
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ : अडकूर ते चंदगडला जोडणाऱ्या सत्तेवाडी, कानडी, सावर्डे, शिरगाव मार्गे रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप आर्दाळकर यांनी केली आहे.
गारगोटी-कोदाळी महामार्ग अंतर्गत चंदगड तालुक्याच्या हद्दीत मलगेवाडी फाट्यापासून गेली तीन वर्षे हे काम रखडले आहे. जागोजागी रस्त्यात चर मारल्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. रस्त्यात मोठमोठ्ठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता एकूणच वाहतुकीसाठी अडचणीचा ठरला आहे. त्याला पर्याय म्हणून अलीकडच्या काळात अडकूर, सत्तेवाडीमार्गे चंदगडफाटा या रस्त्याला वाहनधारक पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावर वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या साईड पट्टीवर झुडपे वाढली आहेत. गटारांत घाण तुंबल्यामुळे पाणी तुंबले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने अतिवृष्टी झाल्यास हेच पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीला धोकादायक ठरू शकते. या मार्गावर घटप्रभा नदीवरील कानडी बंधारा म्हणजे वाहतुकीचा मुख्य दुवा आहे. परंतु त्याला संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे दुर्घटना नाकारता येत नाही. त्याला लोखंडी रेलिंग करण्याची गरज आहे. बांधकाम विभागाने याबाबत नियोजन करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76445 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..