इचलकरंजीत कामगार कुटुंबियांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत कामगार कुटुंबियांचा सत्कार
इचलकरंजीत कामगार कुटुंबियांचा सत्कार

इचलकरंजीत कामगार कुटुंबियांचा सत्कार

sakal_logo
By

35488
----
इचलकरंजीत कामगार कुटुंबीयांचा सत्कार

इचलकरंजी, ता. १२ ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कोल्हापूर यांच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त येथील कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कार्यक्रम झाला. एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबीयांचा सत्कार केला. गोल्डविंग ग्रुपच्या संस्थापक- अध्यक्षा मौश्मी आवाडे आणि लक्ष्मी-विष्णू सहकारी बँकेच्या अध्यक्षा वृषाली साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. सातत्याने वाढणाऱ्‍या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीमुळे उद्‍भवणाऱ्‍या समस्यांशी लढा देऊन व जनजागृती करण्याबाबत यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने एका अपत्यावर अथवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबीयांचा सत्कार केला. सौ. हीना कलावंत व फिरोज कलावंत, सौ. विद्या एतावडेकर व प्रशांत एतावडेकर, सौ. सीमा मिसाळ व दिलीप मिसाळ, सौ. राणी खडके व महादेव खडके, सौ. अर्चना पवार व रामदास पवार या दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ, फेटा व भेटवस्तू असे सत्काराचे स्वरूप होते. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कविता कोरवी, नजमा शेख, सर्जेराव हळदकर, सुरेश पवार, सचिन खराडे, सुहास कांबळे, संग्राम सटाले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76562 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top