पाणी, आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी, आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत
पाणी, आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत

पाणी, आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत

sakal_logo
By

ich123.jpg
इचलकरंजी ः ताराराणी पक्षाच्या वतीने सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन सत्कार करताना प्रकाश दत्तवाडे यांच्यासह पदाधिकारी.
---
पाणी, आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत
ताराराणी पक्षातर्फे प्रशासक देशमुख यांच्याकडे मागणी
इचलकरंजी, ता. १२ ः येथील ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन शहरातील पाणी आणि आरोग्य यांना प्राधान्य देऊन हे प्रश्‍न तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्राधान्याने सर्वच प्रश्‍न मार्गी लावण्यासह इचलकरंजी महापालिकेला लौकिक प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.
इचलकरंजी नगरपालिकेचे नुकतेच महापालिकेत रूपांतर झाले असून, प्रशासकपदी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. त्यांची ताराराणी पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट घेतली. यावेळी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्याशी शहरातील आरोग्य व पाणी यासह विविध प्रश्नांवर चर्चा केली.
शहरात पाणी, आरोग्य आणि दिवाबत्ती या आवश्यक सुविधांची गरज आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. अनेक भागात कचऱ्‍याचे ढीग साचलेले दिसून येतात. एलईडी दिव्यांची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक तेथे मागणी करूनही दिवाबत्तीची सोय केली जात नाही. कचरा उठाव व साफसफाईमध्ये सातत्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
मध्यंतरीचा काळ वगळता इचलकरंजी नगरपालिकेचा लौकिक होता, तो महापालिका म्हणून पुनश्‍च मिळवून देण्यासाठी आणि नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, राजाराम बोंगार्डे, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, संजय केंगार, एम. के. कांबळे, नीतेश पोवार, रमेश पाटील, कुमार पलंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76573 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..