गुरू वंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरू वंदन
गुरू वंदन

गुरू वंदन

sakal_logo
By

गुरुपौर्णिमा विशेष
-
35553
डॉ. बिंदू राव

गुरू परंपरेतून रूजवले भरत नाट्यम्
डॉ. बिंदू राव यांनी तीनशेहून अधिक शिष्यांना दिले नृत्यकलेचे धडे

कोल्हापूर, ता. १२ ः भारतीय परंपरेत अनेक गुरूंनी तपश्चर्या करून कला, संस्कृतीचे विविध पैलू आत्मसात केले. यातील शास्त्रीय नृत्यकलाही अनेक गुरूंनी पुढे चालवली. मन व शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच प्रसन्नतेने जगण्याची ऊर्जा देणारी भरत नाट्यम् नृत्यकला गुरू परंपरेतून जपली गेली. अवघड पण आरोग्यदायी नृत्य प्रकाराचे ज्ञानदान नृत्यगुरू डॉ. बिंदू राव करतात.

डॉ. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून भरत नाट्यममध्ये पीएचडी मिळवली. तीनशेहून अधिक शिष्य घडवत ही प्राचीन कला कोल्हापुरात रूजवण्यासाठी वीस वर्षे योगदान दिले आहे.
दक्षिण भारतीय नृत्यकलेचे पारंपरिक तसेच शिक्षण घेऊन डॉ. बिंदू राव कोल्हापुरात आल्या. भरत नाट्यमचे वर्ग सुरू केले. भरत नाट्यमचे उच्च शिक्षण व संशोधन करू लागल्या. त्यांनी नृत्य संस्कृतीचे प्राचीन पैलू संकलित केले. त्या आधारे भरत नाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊ लागल्या. त्यांना गुरूचा मान आहे तो त्यांच्या संशोधन व ज्ञानदानाच्या कार्यामुळे.
नव्या काळात मनोरंजन क्षेत्रात नृत्याला ग्लॅमर आले. विविध स्पर्धांचे वाढते आकर्षण आहे. यातून चित्रपट गीते, लोकगीतांवरील नृत्य सादर करण्यासाठी आमच्या मुलाला तातडीने नृत्य शिकवा, असा आग्रह धरणारे पालक भेटले. याबाबत डॉ. बिंदू म्हणाल्या की, कोणतेही शास्त्रीय नृत्यही झटपट अवगत होत नाही. त्यासाठी दीर्घकालीन शिक्षण व रियाजाची अवश्यकता असते. भरत नाट्यम हे केवळ नृत्य नसून कायिक, वाचिक, मुद्रा अभिनय अशा विविध अंगाने ते शिकावे लागते. भरत नाट्यमची एकेक पायरी शिकताना संगीताचा ताल-सूर-लय यांच्याशी ओळख पक्की होते. संगीत नृत्याचा एकरूपी आविष्कार सादरकर्त्या नर्तकाला चैतन्य देतो, तर त्याचा कलाविष्कार प्रेक्षकांना प्रसन्न करतो म्हणून भरत नाट्यममध्ये भाव आविष्काराला विशेष महत्त्व आहे.

कोट
भरत नाट्यम् हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. भरत नाट्यम् हे नाव पन्नास वर्षांत प्रचलित झाले. हा नृत्य प्रकार सहाशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथात उल्लेखला आहे. गुरू परंपरेतून पुढे तो चालत आला. तेव्हा पुराणात बाणी असा भरत नाट्यमचा नामोउल्लेख आहे. या नृत्याची वेगवेगळी शैली अनेक गुरू घराण्यांनी जपली. भरत नाट्यमला आध्यात्माची जोड आहे. पुराण कथांचा सारांश त्यात आहे, आदी बाबी संशोधनात पुढे आणल्या आहेत.
डॉ. बिंदू राव, नृत्यगुरू.

चौकट
शरीर, मन प्रसन्न करणारा आविष्कार
भरत नाट्यम् व योगासन यात साधर्म्य भासत असले तरी भरत नाट्यम् नृत्य संगीताच्या साथीने करताना शरीरातील प्रत्येक अवयवाची हालचाल होते. या हालचालींना अर्थ असतो. विशिष्ट कथा नृत्यसंगीतातून सांगितल्या जातात. यात नृत्य व संगीताचा अचूक समन्वय राखताना नर्तकाची दृष्टी, श्रवण आणि मनाची एकाग्रता लागते. यातून मनाला प्रसन्नता लाभते, तर पाहणाऱ्याला तीच अनुभती येते. शरीर व मन तंदुरुस्त ठेवणारा कलाविष्कार असल्याचे डॉ. राव
सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76582 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..