ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे निवेदन
ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे निवेदन

ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे निवेदन

sakal_logo
By

35517
कोल्हापूर : ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे सेंट्रल जीएसटी कार्यालयाचे अपर आयुक्त राहुल गावडे यांना निवेदन देताना असोसिएशनचे पदाधिकारी.

ग्रेन मर्चंट असोसिएशनतर्फे निवेदन
कोल्हापूर : दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनतर्फे जीएसटीविरोधात सेंट्रल जीएसटी कार्यालयाचे अपर आयुक्त राहुल गावडे यांना निवेदन
दिले. निवेदनातील माहितीनुसार १ जुलै २०१७ ला जीवनावश्यक अन्नधान्यावर शून्य टक्के जीएसटी होता. त्यानंतर ब्रँडेड उंची तांदळाला तो पाच टक्के आकारला जाऊ लागला. आता १८ जुलैपासून सर्वच अनब्रँडेड अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लागणार. यामुळे प्रचंड भाववाढ होईल, महागाई वाढेल. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. याविरोधात असोसिएशनतर्फे गावडे, राज्य कर सहायक आयुक्त सुनीता थोरात यांना निवेदन दिले. असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे, ‘चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, ग्रेन मर्चंटस्‌चे संचालक वैभव सावर्डेकर, श्रीनिवास मिठारी, सुरेश लिंबेकर, विवेक शेटे, विजय कागले, धन्यकुमार चव्हाण, धर्मेंद्र नष्टे, रितेश हळदे, विवेक नष्टे, ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत हळदे, अजित कोठारी, सचिव रमेश पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76593 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top