
आमदार ऋतूराज पाटील पाहणी
३५५१५
आमदार ऋतुराज पाटील
यांनी केली रामानंदनगरची पाहणी
कोल्हापूर, ता. १२ ः संभाव्य पूर परिस्थितीचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंदनगर परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या वर्षी संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी या परिसरात भेट देऊन आढावा घेतला. बंद असलेले पथदिवे, उन्मळून पडलेल्या झाडांचे वाहतुकीसाठी होत असलेले अडथळे, ओढ्यातून वाहून आलेल्या झाडांमुळे पाण्याच्या प्रवाहाला होत असलेला अडथळा या समस्यांवर यावेळी चर्चा केली. महानगरपालिकेच्या विद्युत आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही सखल भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षितस्थळी तत्काळ स्थलांतरित व्हावे. कोणतीही मदत हवी असल्यास तत्काळ संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, संजय पाटील, संतोष जरग, प्रमोद भोपळे, सतीश भाले, संजय वाडकर, शीतल नलवडे, वैभव देसाई आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76602 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..