अन्नधान्य पदार्थांवर जीएसटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नधान्य पदार्थांवर जीएसटी
अन्नधान्य पदार्थांवर जीएसटी

अन्नधान्य पदार्थांवर जीएसटी

sakal_logo
By

35524
खाद्य पदार्थांवरील पाच
टक्के जीएसटी रद्द करा

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी

कोल्हापूर, ता. १४ : जीएसटी अंमलबजावणी देशात लागू केली, त्यावेळी केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येणार नाही, असे सांगितले होते; मात्र ४७ व्या जीएसटी कौन्सिलने अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ्यांवरील नॉन ब्रँडेड वस्तूंवरही पाच टक्के जीएसटी आकारणी प्रस्तावित केली आहे. तो प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने कोल्हापूर जीएसटी आयुक्त नसिम अर्शी यांना केली. निवेदनाची एक प्रत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविली.
निवेदनातील माहितीनुसार, अन्न धान्य आणि खाद्यपदार्थांमधील नॉन ब्रँड वस्तूंवरही जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यास मोठा परिणाम शेतकरी, सामान्य नागरिकांवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढविल्यामुळे कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली. या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. जीएसटीचा विपरीत परिणाम पारंपरिक व्यापारावर पडेल. त्यामुळे यावर अवलंबून सर्व घटकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळेल.
‘चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, ‘कॅट’चे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, ‘चेंबर’चे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, धनंजय दुग्गे, संचालक अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76604 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..